ठाण्यात जनसुरक्षा कायद्याला कडाडून विरोध
ठाणे, प्रतिनिधी - भाजप सरकारने आणलेला जनविरोधी, घटनाविरोधी, लोकशाही हक्क नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हा शाखा तसेच भारत जोडो जन सुरक्षा विरोधी संघर्ष समिती ठाणे जिल्हा त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्ष सामाजिक आणि पुरोगामी जन संघटना यांच्याकडून आज कडाडून विरोध केला.
जन सुरक्षा विधेयक हुकूमशाही पद्धतीने असून सरकार विरोधात आवाज दडपण्यासाठी या विधेयकाचा वापर केला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कायद्याची सध्या गरज नसताना सरकारने मोठ्या उद्योजकांसाठी केलेला कायदा असल्याचा आरोप आंदोनकर्त्यांनी केला. तसेच हा कायदा विरोधी पक्षातील लोकांसाठी लागू असणार नसून हा सर्वसामान्य जनतेसाठी असणार आहे कारण याच अधिकाराचा उपयोग करून नागरिकांना सत्ताधारी आपल्या बाजूने ओढण्यासाठी काहीही करू शकतात यासाठी जनसुरक्षा कायदाविरोधी संघर्ष समितीने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून, या आंदोलनात ठाणेकरांनी सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे , आमदार जितेंद्र आव्हाड ,संपर्कप्रमुख नरेश मनेरा ,
भारत जोडो ठाणे जिल्हा संघर्ष समितीचे राजेंद्र चव्हाण,, विशाल जाधव, नारी अत्याचार विरोधी मंचाचे मुक्ता श्रीवास्तव, शोषित जन आंदोलन समितीचे हिंदवी तुळपुळे,
श्रमिक जनता संघाचे जयजीत खैरलिया, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उदय चौधरी, भारतीय महिला फेडरेशनचे निर्मलाताई पवार, विद्युत कर्मचारी संघ निलेश्वर बनसोडे, राष्ट्र सेवा दलाचे सुहास पोते त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष सुहास देसाई, पाटील तसेच प्रवक्ते रचना वैद्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा संपर्कप्रमुख रोहिदास मुंडे ,जिल्हाप्रमुख केदार दिघे ,महिला जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, कळवा मुंब्रा विधानसभा संघटिका पुष्पालता भानुषाली, कळवा समन्वयक माजी नगरसेविका नीलिमा ताई शिंदे, ठाणे उपजिल्हाप्रमुख कृष्णकांत कोळी, सुनील पाटील, कल्याण उपजिल्हाप्रमुख विजय देसाई , समन्वयक संजय तरे,ठाणे शहर प्रमुख अनिश गाढवे ,, मुंब्रा शहर प्रमुख विजय कदम ,ठाणे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण ,वसंत गव्हाळे, बिपिन गेहलोत,विधानसभा संघटक चंद्रकांत विधाते , दत्ता पागवले डंगारे, स्वप्निल शिरकर आकांक्षा राणे, वैशाली शिंदे, प्रमिला भांगे, ज्योती कोळी,अनिता प्रभू, विद्या कदम, सुनंदा देशपांडे, राजश्री सुर्वे,, पुनम जाधव, रेखा पाटील, माया जगताप, वैशाली पार्टी ,संगीता साळवी, कांता पाटील, स्मिता कुडुळकर, अर्चना शाहीर, गीता सुर्वे,अपर्णा भोईर ,प्रमिला भांगे , सुप्रिया गावकर, अमृता पवार, रूपाली लोहाटे, शारदा शिंदे,तसेच सर्व विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख व इतर शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment