जिल्हा परिषद मधील 100 दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न सुटला


ठाणे - मा उपमुख्यमंत्री याच्या आदेशाने व माझ्या पाठपुराव्याने ठाणे जिल्ह्यातील 100 दिव्यांग कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदच्या सेवेत सामावून घेण्यात आले. गेली 15/20 वर्ष हे कर्मचारी ठेकेदारी पद्धतीवर काम करत होती. यासाठी adv बंडू घोडे सर दिव्यांगाना घेऊन याप्रकरणाचा पाठ पुरावा करत होते, त्यांनी मा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची दिव्यांगाना घेऊन अनेक वेळा भेट घेतली. माझ्याकडे हे प्रकरण आल्यावर मी साहेबांच्या सोबत बोलून याचा संबंधित अधिकारी शिक्षण अधिकारी राक्षे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश घुगे यांच्याकडे पाठपुरावा केला. आज मी त्यांना भेटायला गेलो असता, त्यांनी या सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या समायोजन केल्याचा थेट कर्मचाऱ्यांचा आदेशाचं काढला.

      दिव्यांग कर्मचारी आणि याकमाचा पाठपुरावा करणाऱ्या adv बंडू घोडे सरांनी माझा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत