POP मूर्तींवर अखेर कारवाईची सुरुवात"

 "खाडीचा श्वास घोटणाऱ्यांवर शासनाची करडी नजर!

 पर्यावरण अभ्यासकाच्या निवेदनाची मुख्यमंत्री दालनाने घेतली गंभीर दखल 

ठाणे:ठाण्यातील कृत्रिम विसर्जन तलावातून थेट खाडीत POP (Plaster of Paris) मूर्ती टाकल्या जात असल्याच्या गंभीर प्रकारावर अखेर शासनचे लक्ष वेधलं आहे. पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत रविंद्र सिनकर यांनी केलेल्या निवेदनानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने अधिकृत दखल घेत, नगरविकास विभागाने  ठाणे महापालिकेला स्पष्ट सांगितले आहे की, “नियमानुसार कार्यवाही करा आणि संबंधितांना अवगत करण्याचं सांगितले आहे.

प्रशांत रविंद्र सिनकर

ठाणे शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कृत्रिम विसर्जन तलावांची संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून राबवण्यात येत आहे, ही निश्चितच प्रशंसनीय बाब आहे. परंतु दुर्दैवाने, अनेक वेळा या कृत्रिम तलावांतील POP (Plaster of Paris) मूर्ती नंतर खाडीच्या  जलस्रोतांमध्ये विसर्जित केल्या जात असल्याचे समजते. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी पाठवले होते. या निवेदनाची गंभीर दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. झालेल्या सकारात्मक  हालचालीमुळे पर्यावरणप्रेमी आणि कोळी बांधवांच्या डोळ्यांत आशेची नवी किरण चमकली आहे. डॉ. सिनकर भावनिक शब्दांत म्हणाले, “POP मूर्तींचं खाडीत विसर्जन म्हणजे समुद्राचा श्वास घोटणं आहे. जर सरकारने वेळेवर पाऊल उचललं, तर खाडीचा निळा रंग आणि समुद्री जीव वाचतील.”


दिलेल्या निवेदना संदर्भात नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी अनिरुद्ध गोसावी यांचे नुकतेच पत्र डॉ. सिनकर प्राप्त झाले आहे , त्यामुळे या प्रकरणात कडक कारवाई होणार आहे. आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती मिळणार आहे. हा निर्णय फक्त ठाण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील खाड्या आणि किनारपट्टीसाठी निर्णायक ठरू शकतो. POP मूर्तींमुळे होणारं जलप्रदूषण केवळ समुद्राची जैवविविधताच संपवत नाही, तर शतकानुशतकं मासेमारीवर जगणाऱ्या कोळी समाजाच्या पोटावर लाथ मारत आहे.


तरीही स्थानिकांचा सवाल कायम आहे  “हे आदेश कागदावरच थांबणार, की खरंच खाडी वाचवण्यासाठी पाऊल पडणार?”

गणेशोत्सवाच्या तोंडावर आलेली ही घडामोड एक स्वागतार्ह पाऊल आहे. मात्र खरा दिलासा तेव्हाच मिळेल, जेव्हा प्रत्येक विसर्जनानंतर पाणी निळंच राहील, खाडीत पुन्हा जीवनाची हालचाल दिसेल, आणि कृत्रिम तलावातील मूर्ती पुन्हा खाडीत टाकण्याची ही पर्यावरणघातकी पद्धत कायमची बंद होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत