ठाण्यात ' मत चोरी ' विरोधात काँग्रेसचा मशाल मोर्चा



ठाणे (प्रतिनिधी): काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. खा. राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे ठोस पुराव्यांसह उजेडात आणले आहेत. ' मत चोरी ' आणि त्यात निवडणूक आयोग आणि भाजपाच्या कथित भूमिकेचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर (जि.) काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चाची सुरुवात ठाणे काँग्रेस मध्यवर्ती कार्यालय येथून होऊन मार्केट रोड मार्गे ठाणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला.मोर्चात सहभागी पदाधिकाऱ्यांनी 'गली गली मे शोर है मोदी सरकार चोर है ', आणि 'वोट चोर गद्दी छोड' अशा घोषण दिल्या. हा मशाल मोर्चा शहराध्यक्ष ॲड विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की निवडणूक आयोगाच्या यंत्रणेचा गैरवापर करत भारतीय जनता पक्षाने रचलेला एक राजकीय कट असून लोकशाहीवर केलेला हल्ला आहे.परंतु काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असून मतदारांचा सन्मान व न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा देत राहील.

      या मोर्चात ठाणे काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह जे बी यादव,भालचंद्र महाडिक,अनिस कुरेशी,महेंद्र म्हात्रे,हिंदुराव गळवे,निशिकांत कोळी,रवी कोळी,स्मिता वैती,शिरीष घरत,अजिंक्य भोईर, संगीता कोटल,शांती इलावडेकर, सुप्रिया पाटील, विनीत  तिवारी,आशिष गिरी, राजू शेट्टी,निलेश पाटील,अंजनी सिंग,जयेश परमार,सुरेश भोईर, नुर्शिद शेख आदी पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत