समाज कल्याण विभागांतर्गंत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू


ऑगस्ट २०२५ अखेर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन

 (जिल्हा परिषद, ठाणे) – समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने ५% दिव्यांग कल्याण सेस व २०% जिल्हा परिषद सेस अंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व मागासवर्गीय (SC/ST/NT) लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


        ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून, लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://zpthaneschemes.com या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे यांनी केले आहे.


५% दिव्यांग कल्याण सेस अंतर्गत प्रमुख योजना:

1. दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे.

2. दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी वाहन(स्कुटी) खरेदीसाठी अनुदान देणे

3. दिव्यांग-दिव्यांग व्यक्तिंना विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे.

4. दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायासाठी शेळीपालन वराहपालन, मत्स व दुग्धव्यवसाय इत्यादीसाठी   अर्थसहाय्य देणे.

5.     दिव्यांग पालकाच्या मुलीसाठी माझी लेक योजनेअंतर्गंत रु 50000/-मुदतठेव रक्कम ठेवणे.

6.     उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्याना विशेष शिष्यवृत्ती देणे.


*२०% जिल्हा परिषद सेस अंतर्गत प्रमुख योजना:*

1. इ.5 वी ते 9 वी च्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकली पुरविणे.

2. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे (एकवेळ)

3. मागासवर्गीय इयत्ता 11वी व 12 वी तील विद्यार्थ्याना MH-CET ENINREEING/JEE//NEET च्या प्रशिक्षणवर्गाची खाजगी संस्थेला दिलेल्या फीची प्रतिपूर्ती करणे.

4. मागासवर्गीय लाभार्थ्यांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य देणे व वैयक्तिक लाभार्थी/महिला बचत गट यांना लघुउद्योगासाठी अर्थिक सहाय्य देणे.

5.     मागासवर्गीय विद्यार्थ्यांना MSCIT संगणक / टंकलेखन (मराठी/इंग्रजी) प्रशिक्षण पुर्ण केल्यावर फी प्रतीपुर्ती करणे.

6.     मागासवर्गीय लाभार्थ्यांना  डिस्को जॅकी (D.J.) साहित्य पुरविणे.


*अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:*

आधारकार्ड

बँक खाते

उत्पन्नाचा दाखला

शैक्षणिक / प्रशिक्षण प्रमाणपत्रे

दिव्यांगत्व प्रमाणपत्र (दिव्यांग अर्जदारांसाठी)

जात प्रमाणपत्र (मागासवर्गीय अर्जदारांसाठी)

स्थानिक स्वराज्य संस्थेचे दाखले

अर्जाची सविस्तर यादी व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


*अर्ज पडताळणी कालावधी:*

तालुका स्तर तपासणी: १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२५

जिल्हा स्तर तपासणी: १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५


           अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व सुलभ ठेवण्यात आली आहे. दारिद्र्यरेषेखालील व वार्षिक उत्पन्न रु. १ लाखपर्यंत असणाऱ्या दिव्यांग व मागासवर्गीय लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.


           जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व पात्र लाभार्थ्यांनी ही सुवर्णसंधी साधून ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पर्यंत अर्ज दाखल करून योजनांचा लाभ घ्यावा. तसेच ग्रामसेवक, सरपंच, शाळा व महाविद्यालयांनी पात्र लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवून योजनांमध्ये सहभाग वाढवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत