"मरणानंतरही द्या जीवनदान" – विद्यार्थ्यांची अवयवदान जनजागृती रॅली

 

ठाणे : आनंद विश्व गुरुकुल नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी "मरणानंतरही द्या जीवनदान" हा प्रभावी संदेश ठाणेकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी भव्य रॅली व पथनाट्याचे आयोजन केले. अवयवदानाविषयी समाजात सकारात्मक विचार आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.


या कार्यक्रमाला सोसायटीचे सचिव आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष  डॉ. प्रा. प्रदीप ढवळ, खजिनदार अक्षर परसनीस, ब्र. नाथ पाई कॉलेजचे प्राचार्य श्री. अनिल बोरणारे , विश्वस्त जेष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या  डॉ. हर्षला लिखिते, महाविद्यालयाच्या प्राचार्य संपदा कुलकर्णी, प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका, डॉ वैदही कोळमकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच सर्व शाखांचे प्राचार्य उपस्थित होते.

मीनाताई ठाकरे नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी, सायंकालीन महाविद्यालयातील एनएसएस स्वयंसेवक, ए.व्ही.जी. ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. रॅलीसोबत सादर करण्यात आलेल्या लघुनाट्यप्रयोगातून अवयवदानाचे महत्त्व, जीवन वाचविण्याची त्याची क्षमता आणि सामाजिक उत्तरदायित्व याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला.


रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी "अवयवदान – अमूल्य दान", "तुमचे एक पाऊल, दुसऱ्याचे आयुष्य" अशा घोषणांनी शहरातील रस्ते दुमदुमवले. बाजारपेठेत व निवासी भागात अनेक नागरिकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. काहींनी अवयवदान नोंदणी करण्याची इच्छाही व्यक्त केली.


ठाण्यातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना दाद दिली. आनंद विश्वगुरू कोण मधील सर्व सहकार्याने कार्यक्रम यशस्वी होण्यात सहकार्य केले त्याबद्दल नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ मयुरी पेंडसे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत