डॉ. सी. पी. राधाकृष्ण यांना उपराष्ट्रपती पदी निवडून आणण्याचा एनडीएच्या खासदारांचा निश्चय
खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्या डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना शुभेच्छा
मुंबई - महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम डॉ. सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार म्हणून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता उभे आहेत. या निवडणुकी संदर्भात आज गुरुवारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र आणि गोवा येथील लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक झाली. महाराष्ट्रातील एनडीएच्या सर्व खासदारांनी उपराष्ट्रपती म्हणून डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना निवडून देण्याचा यावेळी निश्चय केला.
या बैठकीस मंत्री पियुष गोयल, रामदास आठवले, शिवसेना गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपाचे महामंत्री विनोद तावडे आणि मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासमवेत महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदार उपस्थित होते. या बैठकीमध्ये उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांनी संबोधित केले. महाराष्ट्र आणि गोव्यातील एनडीएचे सर्व खासदार यांनी देशाचे हित लक्षात घेऊन ठामपणे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत डॉ. सी. पी. राधाकृष्ण यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली.
खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी डॉ. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment