आम्ही शिवभक्त परिवार, महाराष्ट्र तर्फे रक्षाबंधन सण भारतीय सैन्यासोबत उत्साहात साजरा
आम्ही शिवभक्त परिवार, महाराष्ट्र आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने "एक राखी फौंजी भाई के नाम" हा दर वर्षी साजरा केला जाणारा रक्षाबंधनाचा सण यावर्षी जैसलमेर येथील सीमेवर असणाऱ्या अतिदुर्गम अश्या मोहनगड व सेव्हन गार्ड येथील भारतीय सैनिकांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर उपक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून सुमारे सत्तर हजाराहून अधिक राख्या यावर्षी आल्या होत्या त्या परिवारातर्फे विविध ठिकाणी असलेल्या भारतीय सैनिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्याचे परिवारतर्फे सांगण्यात आले.
जैसलमेर येथे परिवर्तर्फे संस्थेचे संस्थापक - अध्यक्ष दिपेश दळवी, ठाणे विभाग अध्यक्ष - हंसराज जाधव, मुंबई उपनगर अध्यक्ष - अर्जुन धुरी, भिवंडी विभाग अध्यक्ष - मिलिंद पाटील, मिताली पाटील, दिशा दळवी आणि परिवारातील सर्वात लहान दीड वर्षांची युविका उपस्थित होते.
Post a Comment