९ जुलै रोजी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या लाक्षणिक संप

ठाणे:९ जुलै रोजी, दुपारी १२ वाजता, ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर खालील प्रश्नांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण सर्व प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

१) कामगार विरोधी कामगार कायदे, खाजगीकरण, कंत्राटीकरण, रद्द करा.

२) मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रेच्यूॅईटी व मा. गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा.

३) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेंशन योजना लागू करा.

४) पूर्वी प्रमाणे टी एच आर वाटप करण्याचे शासकीय आदेश निर्गमित करून, फेश रेकगनेशन ची अट बंद करण्यात यावी.

५) टी एच आर बंद करून लाभार्थ्यांना खाणे योग्य आहार द्या.

६) लाभार्थ्यांच्या आहारात तिपटीने वाढ करा.

७) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे भरलेल्या फार्म चे १०० टक्के प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे.

८) ऑक्टोबर २०२४ पासून चे थकित प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे.


          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत