प्राथमिक आरोग्य केंद्र, धसई येथे राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमाचा आढावा व “निक्षय पोषण किट” वितरणाचा तालुका स्तरीय शुभारंभ
(जिल्हा परिषद, ठाणे)- जिल्हा मुरबाड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, धसई येथे दिनांक १५ जुलै, २०२५ रोजी राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमाच्या आढाव्यासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अलका परगे यांनी भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला व क्षयरोग नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी क्षयरोग रुग्णांच्या पोषणासाठी Welfare Society for Destitute Children, एकलहरे या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने “निक्षय पोषण किट” वाटप उपक्रमाचा तालुकास्तरीय शुभारंभ देखील डॉ. परगे यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमांतर्गत मुरबाड तालुक्यातील सर्व सक्रिय क्षयरोग रुग्णांना नियमित पोषण किट देण्यात येणार आहेत.
या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बनसोडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक सहभागाच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती होण्याची आवश्यकता व्यक्त केली.
कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर गोर्डे, आरोग्य सहायक, आरोग्य कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ औषधोपचार नव्हे तर रुग्णांच्या पोषण स्थितीकडेही लक्ष देण्यात येत आहे, जे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या उद्दिष्टांनुसार आरोग्यदायी समाज घडवण्यासाठी महत्त्वाचे आहे, असे डॉ. परगे यांनी यावेळी स्पष्ट केले.
Post a Comment