गोपीचंद पडळकरविरोधात मुंब्र्यात हल्लाबोल
तर चौकाचौकात पडळकर यांचे पुतळे जाळणार - शमीम खान
ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डाॅ.जितेंद्र आव्हाड अंगावर गाडी घालून शिविगाळ करणारे गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात मुंब्रा येथे सय्यद अली अश्रफ (भाई साहब), शमीम खान आणि शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून तसेच त्यांचे छायाचित्र पायाखाली तुडवून निषेध करण्यात आला. दरम्यान, पडळकर यांच्यावर पोलीस कारवाई करावी तसेच त्यांनी जाहीर मागावी; अन्यथा, सबंध ठाणे शहरातील चौकाचौकात त्यांचे पुतळे जाळू, असा इशारा कळवा - मुंब्रा विधानसभा क्षेत्राध्यक्ष शमीम खान यांनी दिला.
डाॅ.जितेंद्र आव्हाड हे बुधवारी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर धनंजय देशमुख यांच्यासह चालत असताना पडळकर यांनी अचानक गाडी थांबवून तसेच गाडीचा दरवाजा उघडून डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि धनंजय देशमुख यांना इजा करण्याचा प्रयत्न केला. डाॅ.जितेंद्र आव्हाड हे गाडीकडे पहात असताना गोपीचंद पडळकर यांनी शिविगाळ केली. या घटनेचा निषेध म्हणून मुंब्रा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हजारो कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी , " मंगळसूत्र चोराला अटक करा... मंगळसूत्र चोराला बेड्या घाला; अशा घोषणा देऊन पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारले. पडळकर यांच्या प्रतिमा पायाखाली तुडविण्यात आल्या. तसेच, मुंब्रा पोलिसांना निवेदन देऊन पडळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
याप्रसंगी शमीम खान यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली. पडळकर हे काल परवाचे आमदार आहेत. त्यांनी राष्ट्रीय नेते असलेल्या डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकाटीप्पणी करणे म्हणजे सूर्यावर टीका करण्यासारखे आहे. डाॅ. आव्हाड हे ज्येष्ठ आमदार आहेत. त्यांच्या अंगावर गाडी घालणे किंवा त्यांना शिविगाळ करणे यातून पडळकर यांची संस्कृती दिसून येत आहे. गोपीचंद पडळकर यांनी जाहीरपणे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांची माफी मागावी; अन्यथा, चौकाचौकात त्यांचे पुतळे तर जाळूच, पण ते ठाणे, मुंब्रा, शहरात आले तर त्यांची चांगलीच नाकेबंदी करू, असा इशारा दिला. तर शानू पठाण यांनी, पडळकर यांच्यावर कडक कारवाई करावी; भाजपने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली
Post a Comment