श्री माँ विद्यालयात फोर स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा

 


ठाणे - श्री माँ विद्यालय, घोडबंदर रोड श्री माँ हॉल मध्ये फोर स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली.  श्री माँ गुरुकुल आणि अॅस्पायरंटस् टेबल टेनिस अॅपॅडॅमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ठाणे, मुंबई शहर, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील विविध वयोगटांतील 530 हून अधिक टेबल टेनिस खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सहा दिवसांच्या या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल श्री माँ गुरुकुल आणि अॅस्पायरंटस् टेबल टेनिस अॅकॅडॅमीचे सर्वांनी कौतुक केले.  

पालक, प्रशिक्षक आणि प्रेक्षकांनी स्पर्धक खेळाडूंना टाळ्या वाजवून दिलेल्या प्रोत्साहनामुळे वातावरण भारावून गेले होते. बक्षीस वितरण समारंभाने या भव्यदिव्य स्पर्धेची सांगता झाली. 

स्पर्धेत 13 वर्षांखालील मुलींमध्ये जिनया वधान ही प्रथम क्रमांकाची विजेती ठरली. ज्ञानश्री तरडे हिला द्वीतीय क्रमांक मिळाला 11 वर्षांखालील मुलांमध्ये युवानसिंह वालिया व अव्यानसिंह वालिया यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. मुलींमध्ये साईशा मधूर व देवेशी गावडे तर मुलांमध्ये अधिराज चौहान व श्रेयन मिश्रा यांना उपांत्य विजेतेपद मिळाले.

या स्पर्धेला श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूशन्स्चे चेअरमन श्री बालगोपाल, श्री माँ विद्यालयाच्या प्रिन्सिपॉल मिनी नायर, वाईस प्रिन्सिपॉल मेघना वांगे, हेड मिनिस्टेट रमा अनंतरामन, लक्ष्मी अय्यर तसेच टी.डि.टि.टि.ऐ आणि एम.एस.टि,टि.ए चे सेक्रेटरी यतीन टिपणीस यांची उपस्थिती लाभली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत