सामाजिक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन आणि CEGIS यांच्यात सामंजस्य करार

 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री कार्यालय आणि सेंटर फॉर इफेक्टिव्ह गव्हर्नन्स ऑफ इंडियन स्टेट्स (CEGIS) यांच्यात 5 वर्षांसाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. 

या करारामुळे सामाजिक क्षेत्रातील योजना, उपक्रम व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तांत्रिक, विश्लेषणात्मक व धोरणात्मक सहाय्य उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयासाठी ‘डिसीजन सपोर्ट सिस्टीम’ (DSS) विकसित करण्यात येणार असून, या प्रणालीमुळे डेटा आधारित निर्णयप्रक्रियेस चालना मिळणार आहे. यंत्रणा वॉर रुम प्रणालीशी जोडली जाईल व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय निकषांनुसार योजनेची प्रगती मोजता येणार आहे. माहितीतील विसंगती कमी करणे आणि नागरिकांच्या अभिप्रायाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्यक्षम देखरेखीसाठी या प्रणालींचा उपयोग केला जाणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सामाजिक योजनांच्या अंमलबजावणीसाठी मागोवा प्रणाली (Tracking System) अत्यंत उपयुक्त ठरेल. या करारामुळे धोरणात्मक क्षमता वाढेल व सेवा वितरणात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक प्रभावी होईल.

करारप्रसंगी सीईजीआयएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय पिंगळे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत