महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे शहर कार्याध्यक्षपदी अनिल ठाणेकर व प्रधान सचिवपदी अशोक मोहिते यांची निवड

 


ठाणे - प्रतिनिधी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ठाणे शहरात ठाणे संपर्क शाखा स्थापन करण्यात आली असून शाखेच्या कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार अनिल ठाणेकर व प्रधान सचिवपदी टीजेएसबी बँकेचे निवृत्त अधिकारी अशोक मोहिते यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक सदस्य प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डाॅ. सुषमा बसवंत, नामदेव म्हात्रे, डाॅ. शशिकांत शिंदे, सारीका माने, पत्रकार अरविंद जोशी, पत्रकार सतिश अहिरे, पत्रकार सलमान पठाण, छाया ठाणेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.*


सुरुवातीला उपस्थित साथींनी आपला परिचय करुन दिला. यानंतर डाॅ. सुषमा बसवंत यांनी अंनिसची संघटनात्मक रचना व पंचसूत्री याची मांडणी केली. प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे, यांनी अंनिसच्या स्थापनेचे कारण, श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक स्पष्ट केला. पत्रकार अनिल ठाणेकर यांनी येत्या तीन महिन्यांत अंनिसचे कार्य ठाणे शहरात दखल घेण्याइतपत वाढवून ती लवकरच उपक्रमशील शाखा बनवू असे उपस्थितांना आश्वासित केले. यावेळी झालेल्या प्रश्नोत्तरात डाॅ. शशिकांत शिंदे यांनी शासकीय निधीने अंनिसचे कार्यक्रम राबवू शकतो का ? असा प्रश्न विचारला असता प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुडे यांनी स्पष्ट केले की, शासकीय निधी ऐवजी कार्यकर्त्यांच्या व लोकसहभागातून जमा केलेल्या निधीवर अंनिसचे कार्यक्रम व संघटनात्मक कामे करण्यावर आपला भर असतो. पण अटीशर्तीविना शासकीय मदतीने संयुक्त कार्यक्रम घेण्यास हरकत नाही. पण त्यावर आपला भर असता कामा नये. यानंतर ठाणे शहर संपर्क शाखेची स्थापना झाल्याचे जाहीर करण्यात येऊन कार्याध्यक्षपदाची जबाबदारी ज्येष्ठ पत्रकार अनिल ठाणेकर व प्रधान सचिवपदाची जबाबदारी टीजेएसबी बँकेचे निवृत्त अधिकारी अशोक मोहिते यांच्यावर सोपविण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत