शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड
पालघर (जिमाका) आधुनिक काळातील जीवनशैली पाहता शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्या निरोगी ठेवण्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.
अकराव्या आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्त जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपजिल्हाधिकारी रविंद्र राजपूत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, तहसीलदार सचिन भालेराव, तसेच शालेय व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतता खूप महत्वाची आहे. योगसाधनेतून मानसिक स्थैर्य लाभते. म्हणून शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तसेच निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी सर्वांनी नियमितपणे योगसाधना करावी, असे आवाहनहि जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड म्हणाले, सध्याच्या धावपळीच्या जिवनात सर्वांची जीवनशैली बदललेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने सकस आहार घ्यावा. पालकांनी देखील आपल्या पाल्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे. आज प्रत्येकाला ताण-तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये नियमितपणे योगा, व्यायामांचा समावेश करावा. योग हा फक्त व्यायाम नसून योगामुळे शारिरीक, मानसिक आरोग्य सुदृढ राहते. नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. योगामुळे मन:शांती तर मिळतेच शिवाय तणाव दूर होऊन एकाग्रता सुध्दा वाढण्यास मदत होते, असेही जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
यावर्षीच्या योग दिनाचे 'एक पृथ्वी, एक स्वास्थ्य के लिए योग' हे घोषवाक्य आहे. केंद्र शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या Common Yoga Protocol नुसार प्रार्थनेने योग प्रात्यक्षिकांची सुरुवात झाली. यावेळी योग पूर्व व्यायाम प्रात्यक्षिकासह प्राणायाम, नाडी शोधन क्रिया, भ्रामरी हे योग प्रकार करुन घेण्यात आले. त्यानंतर ध्यानसाधना करण्यात आली. उपस्थित अधिकारी-कर्मचारीआणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली.
Post a Comment