प्रिती शाह यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील अभिमानास्पद सहभाग!

 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मंत्रालय, मुंबई येथे प्रिती अल्पेश शाह यांनी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीसीएस लंडन मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन फिनिशर्सचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केल्याबद्दल प्रिती शाह यांचे अभिनंदन केले. 

27 एप्रिल 2025 रोजी लंडन, यूके येथे झालेल्या मॅरेथॉनमध्ये 57,449 पैकी 56,640 धावपटूंनी मॅरेथॉन पूर्ण करत फिनिशर्सचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. या विक्रमी कामगिरीत प्रिती शाह यांचा सहभाग महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत