मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न


ठाणे  : ठाणे शहर बदलते आहे. सोयी सुविधा येत आहेत. क्लस्टर योजनेच्या रूपाने २०२० पर्यंतच्या सगळ्यांना घर मिळणार आहे. त्यामुळे आजचा हा लोकार्पण सोहळा म्हणजे वचनपूर्ती सोहळा आहे. दिलेला शब्द पूर्ण करतो हे राज्याला माहिती आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात केले. 

दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील नूतनिकृत आसनव्यवस्था लोकार्पण, खंडू रांगणेकर बॅडमिटन हॉल विस्तार प्रकल्पाचा शुभारंभ, जांभळी नाका येथील anad दिघे टॉवरच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन, ठाणे स्टेशन परिसर सुशोभिकरण उपक्रमाचे भूमिपूजन, छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण आणि पाणी प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रत्यक्ष करण्यात आले. त्यानंतर, त्यांनी शेठ लखमिचंद फतेचंद प्रसूतीगुहाचे लोकार्पण केले. तसेच, तिथे जनतेशी संवाद साधला.

खासदार नरेश म्हस्के आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच महापालिका अधिकाऱ्यांमुळे हे उत्तम प्रसूतिगृह तयार झाले आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महापालिकेने आता त्याची व्यवस्था नीट ठेवावी, असेही त्यांनी निर्देश दिले.

आतकोली येथे क्षेपणभूमीवर उद्यान फुलते आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री हरित ठाणे योजनेत २ लाख झाडे लावली जाणार आहेत. तसेच, सेंद्रिय शेतीचा प्रयोगही ठाणे महापालिका करीत आहे. अशा प्रयोगामुळे ठाणे शहर बदलू लागले आहे. 


तत्पूर्वी, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण केले. एकुण १० नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर आजपासून सुरू होत आहेत. फिरता सुसज्ज दवाखाना उपलब्ध होत आहे. नाल्यांची कामे सुरू झाली असल्याचेही त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.

गुरुवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विशेष निधीतून साकार झालेल्या आणि होत असलेल्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, शुभारंभ आणि भूमिपूजन केले. या कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, मीनाक्षी शिंदे, माजी परिवहन सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक मालती पाटील, रमाकांत पाटील, भरत चव्हाण, पूजा वाघ, सुधीर कोकाटे, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, ठाणे जिल्हा शहर आणि जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त मीनल पालांडे, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आणि राजेश सोनवणे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, डॉ. वर्षा ससाणे, डॉ. राणी शिंदे, वृक्ष अधीक्षक केदार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

धर्मवीर आनंद दिघे यांचे देखणे स्मारक होणार

छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे धर्मवीर आनंद दिघे टॉवरची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तेथे आनंद दिघे यांचा पूर्णाकृती पुतळाही आहे, हे त्यांचे अतिशय देखणे स्मारक होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

तसेच, खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलच्या विस्ताराने येथे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षण देता येणार आहे. येथून ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू घडतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सध्या खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये पाच बॅडमिंटन कोर्ट असून, नवीन विस्तारीकरणाच्या नियोजित इमारतीत आणखी पाच कोर्ट, तसेच मुला-मुलींचे स्वतंत्र वसतिगृह (हॉस्टेल), व्यायामशाळा व इतर सर्व आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या नवीन इमारतीचे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार असून, येथे सराव करणाऱ्या खेळाडूंना ऑलिम्पिकपर्यंत प्रगती करण्यासाठी सर्व प्रकारची मदत पुरवली जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घोषित केले. या प्रसंगी ठाण्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा प्रात्यक्षिक सामना (प्रदर्शनीय सामना) देखील खेळविण्यात आला. श्री छत्रपती पुरस्कार विजेते दीप रांभीया आणि क्रिश देसाई या बॅडमिंटनपटूंचा खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी, ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान आरंभ

गोरगरीब महिलांमध्ये आरोग्याविषयी जागृती व्हावी, उपचार मिळावेत यासाठी रोटरी क्लब च्या सहकार्याने ठाणे महापालिकेने हाती घेतलेल्या उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

जलतरणपटूंचा सत्कार

ठाणे महानगरपालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे सराव करणारे स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या तीन जलतरणपटूंनी १८ जून, २०२५ रोजी इंग्लंड ते फ्रान्स हे इंग्लिश खाडी हे सागरी अंतर भारताच्या प्राईड ऑफ इंडिया या संघात सहभागी होवून पार केले. त्यापैकी, ठाण्याचा मानव राजेश मोरे(२०) याने इंग्लंड ते फ्रान्स हे ४६ कि.मीचे सागरी अंतर रिले पध्दतीने १३ तास ३७ मिनिटात पोहून पूर्ण केले. तर, आयुष प्रवीण तावडे (१५) आयुषी कैलास आखाडे (१४) या जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे ४६  कि.मीचे ११ तास १९ मिनिटात पोहून पूर्ण केले. या जलतरणपटूंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

ठाणे महापालिका व रोटरी कौशल्य विकास केंद्र


रोटरी क्लब ऑफ ठाणे लेकसिटी, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी, रोटरी क्लब ऑफ नॉर्थ यांच्या सहकार्याने आणि ब्लू स्टार कंपनीच्या सौजन्याने हा प्रकल्प होत आहे. त्यास, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१४२ चे डिस्ट्रिक्ट गर्व्हनर दिनेश मेहता यांचे विशेष योगदान प्रकल्पासाठी लाभले आहे.

तसेच, गरजू महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे उपक्रमाअंतर्गत १५ ई रिक्षाचे वाटप  शुभारंभ

गरजू महिलाना रोजगार उपलब्ध व्हावा व पर्यावरण रक्षण साठी हातभार लागावा, या हेतूने रोटरी क्लब ऑफ ठाणे लेकसिटी यांनी एटॉस इंडिया कंपनीच्या सहकार्याने ठाणे परिसरात १५ ई रिक्षाचे वाटप गरजू महिलाना करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेले उपक्रम -

१. नुतनीकरण करण्यात  आलेली दादोजी कोंडदेव क्रींडागणाची प्रेक्षागॅलरी -

o   दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागॅलरीत प्रेक्षकांना बसण्यासाठी पायऱ्या होत्या. या संपूर्ण प्रेक्षागॅलरीत खुर्च्या बसविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष निधी उपलब्ध करुन दिला.

o   प्रेक्षागॅलरीत एकूण १२ हजार ५०० खुर्च्या बसविण्यात आल्या.

o   स्वतंत्र मिडीया बॉक्स देखील तयार करण्यात आला आहे.

o   सामने सुरू असताना प्रेक्षकांना स्कोअर दाखविण्यासाठी स्क्रीनची व्यवस्था

o   रणजी क्रिकेट सामने, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित केले जाणार सामने होतात.

o   आयपीएल सामन्यांच्या सरावासाठी आरसीबी, केकेआर, पंजाब, राजस्थान रॉयल हे संघ देखील येतात.

o   खर्च – ७.६५ कोटी रुपये

२.   शेठ लखमीचंद फतीचंद प्रसुतिगृह, कोपरी -

o   कोपरी विभागातील रहिवासी शेठ लखमीचंद फतीचंद यांनी त्यांच्या मालकीची ही जागा सन १९६०मध्ये रुग्णालय उभारण्याकरीता ठाणे नगरपालिकेस दिली. या ठिकाणी सन १९७८मध्ये कोपरी प्रसूतिगृह सुरू करण्यात आले.

o   शासन निधीतून नुतनीकरण – खर्च ०१ कोटी रुपये.

o   एकूण खाटा : २५

o   आरोग्य सेवा - गरोदर मातांची प्रसुती-पूर्व तपासणी (प्रयोगशाळा तपासणी तसेच सोनोग्राफी). प्रसुती सेवा (सामान्य प्रसुती व शस्त्रक्रियेदवारे करण्यात येणारी प्रसुती), प्रसुती पश्चात सेवा, मुख्यमंत्री मातृत्व योजना, कुटुंब नियोजन साधने व शस्त्रक्रिया

o   नवजात बालकांची तपासणी व उपचार (SNCU-बांधकाम पूर्ण झालेले आहे)

३.   प्रसुतिगृह, बाळकुम -

o   बाळकुम प्रसुतिगृहाची स्थापना १९८४साली झाली. पुर्नबांधणी २०२५मध्ये झाली.

o   गरोदर मातांची नोंदणी, तपासणी व औषध उपचार, प्रसुती, प्रसुतिपश्चात सेवा.

o   प्रधानमंत्री मातृत्व योजना

o   कुटुंब नियोजनाची साधने पुरवली जातात, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

४.    १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत १० नागरी आयुष्मान मंदिरे-

o   १५व्या वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्य संस्थाना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले  आहेत.

o   केंद्र शासनामार्फत "नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर" स्थापित केली जात आहे.

o   पूर्ण निधी केंद्र सरकारचा आहे.

o   शहरी भागातील अंदाजे १५,००० लोकसंख्येकरिता जन सामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी दवाखान्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे.

o   सदर आरोग्य केंद्रामध्ये मोफत बाह्यरुग्ण सेवा व औषध उपचार, मोफत चाचण्या गर्भवती माताची तपासणी, टेलीकन्सल्टेशन, लसीकरण, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा ई. सेवा देण्यात येणार आहेत.

o   दवाखान्याची वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी ०९.३० ते सायं ०४.३० वाजेपर्यंत

o   ठिकाणे - पडले गाव, विटावा, चांद नगर, हजुरी शाळा, संजय नगर, रुपादेवी पाडा, गावदेवी मैदान, साठे नगर, दिवा शीळ अग्निशमन केंद्र

५.   कन्हैयानगर उद्यान, कोपरी

o   एकात्मिक उद्यान विकास कार्यक्रमांतर्गत सॅटीस पुलालगत असलेल्या १००६ चौ. मी. भूखंडावर उद्यान विकसित करणे.

o   महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद (नगरविकास विभाग)

o   पाथवे, गझिबो, लहान मुलांसाठी खेळणी, ओपन जिम आदी कामे

o   खर्च – रुपये ७५ लाख

o   डिसेंबर -२०२५मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित

६.   सार्वजनिक-खाजगी सहभागातून विकसित कोपरी येथील ०५ दशलक्षलीटर, प्रती दिन क्षमतेचा टर्शरी ट्रिटमेंट प्रकल्प

o   ठाणे महापालिकेचा १२० दशलक्ष प्रती दिन क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र

o   त्यातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी अल्ट्रा फिल्ट्रेशन मेंबरेन तंत्रज्ञानवर आधारित ०५ दशलक्षलीटर, प्रती दिन क्षमतेचा टर्शरी ट्रिटमेंट प्लांट

o   सार्वजनिक-खाजगी सहभागातून निर्मिती

o   कोपरी बायो इंजिअरिंग प्रा. लि. यांच्याकडून प्रकल्पासाठी लागणारा भांडवली खर्च आणि प्रकल्प २० वर्षे चालवण्यासाठी येणारा खर्च.

७.   फिरता दवाखाना

o   मेअर ऑर्गेनिक प्रा. लि. कंपनीचा सीएसआर निधी

o   सुसज्ज फिरता दवाखाना

मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन / शुभारंभ झालेल्या प्रकल्पांची माहिती

१.   छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील धर्मवीर आनंद दिघे टॉवर इमारतीची पुर्नबांधणी, ध्यान मंदिर उभारणी आणि मैदान विकास

o   महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद (नगरविकास विभाग)

o   चौकातील मुख्य भागात धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मारक

o   ४३ मीटर उंचीचा टॉवर, तळमजल्यावर खुला रंगमंच, ग्रीन रुम, पहिल्या मजल्यावर वाचनालय

o   छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला आकर्षक प्रवेशद्वार, कुंपण

o   खर्च – १५ कोटी रुपये

o   एप्रिल – २०२६मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित

२.   ठाणे स्टेशन परिसर सुशोभिकरण प्रकल्प, ठाणे रेल्वे स्टेशन (प.)

o   महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद (नगरविकास विभाग)

o   पादचाऱ्यांचे व वाहतुकीचे सुरळीत नियमन होण्यासाठी

o   रिक्षा व टॅक्सी स्टॅण्डचे नुतनीकरण, स्टेशन बाहेरील गटाराचे व पदपथाचे नुतनीकरण, माहिती फलक बसवणे, झेब्रा क्रॉसिंग व लेन मार्किंग करणे

o   खर्च – रुपये ४.०० कोटी

o   डिसेंबर -२०२५मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित

३.   खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तारीकरण प्रकल्पाचा शुभारंभ

o   महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद (नगरविकास विभाग)

o   पाच माळ्यांचे बांधकाम

o   खेळाडूंसाठी अधिक बॅडमिंटन कोर्ट

o   खेळाडूंसाठी वसतीगृहांची सुविधा

o   राष्ट्रीय केंद्राच्या धर्तीवर विकास

४.   दोस्ती-बाळकूम येथील क्रीडा संकूल आणि ऑल्मिपिक दर्जाची शूटींग रेंज

o   बाळकूम येथील सुमार अडिच एकरच्या आरक्षित भूखंडावर बांधकाम

o   टीडीआऱच्या माध्यमातून बांधकाम

o   महापालिकेचा निधी खर्च न होता खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा उपलब्ध होणार.

o   १०, २० आणि ५० मीटरच्या ऑल्मिपिक दर्जाची शूटींग रेंज

o   स्केटिंग रिंग, जॉगिंग ट्रॅक, लॉन, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा

o   बास्केट बॉल, लॉन टेनिस कोर्ट, व्हॉली बॉल कोर्ट,

o   टेबल टेनिस आणि इतर इनडोअर खेळ, ज्युडो, बॉक्सिंग, क्रॉस फिट, योगा, ओपम जिम

o   सभागृह, उपहारगृह

५.   नगरविकास विभागाकडील निधीतून नाले बांधकाम प्रकल्प

o   महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद (नगरविकास विभाग)

o   ठाणे महापालिका क्षेत्रातील नाल्यांचे बांधकाम

o   खर्च – २०० कोटी रुपये.

o   नाल्यांची लांबी –

६.   ‘बी द चेंज’ (Be The Change) संस्थेच्या सहकार्याने -

o   स्मार्ट बालवाडी प्रकल्प -

o   ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या बालवाड्या या स्मार्ट बालवाडी बनिण्यासाठी "Be The Change" या संस्थेकडून प्रस्ताव.

o   त्यानुसार विभागाकडून ४० बालवाडया "स्मार्ट बालवाडी" बनविण्याचा प्रस्ताव तयार

o   स्मार्ट टीव्हींच्या माध्यमातून इ-लर्निंग उपक्रम

o   बालवाड्यांतील पट वाढवण्यासाठी उपयुक्त

७.   रोटरी क्लबच्या सहकार्याने-

o   कौशल्य विकास केंद्र –

ठामपा शाळा क्र. १९, विष्णू नगर येथे कौशल्य विकास केंद्राची स्थापना

रेमंड्स आणि व्होल्टास या कंपन्यांच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रम

युवकांना प्रशिक्षण आणि रोजगाराची संधी

o   इ-ऑटो रिक्षा वाटप

निराधार महिला आणि तृतीयपंथी यांना स्वयंरोजगाराची संधी

एकूण १० इ-रिक्षाचे वाटप



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत