1000 वर्षांपूर्वीच्या सोमनाथच्या अद्भुत शिवलिंगाचा ठाण्यात दर्शन सोहळा
ठाणे (प्रतिनिधी) 1000 वर्षांपूर्वी मोहम्मद गजनीने उध्वस्त केलेल्या सोमनाथ मंदिराच्या अद्भुत शिवलिंगाचे दर्शन ठाणेकरांना लवकर होणार आहे आर्ट ऑफ लिविंग तर्फे या सोहळ्याचे आयोजन 25 जून रोजी ठाण्याच्या घोडबंदर रोड येथील आर मॉल येथे करण्यात आल आहे.
सोमनाथ मंदिरातील अग्निहोत्री ब्राह्मणांनी उध्वस्त झालेल्या शिवलिंगाचे तुकडे जतन करून त्याचे पुन्हा छोटे छोटे शिवलिंग बनवून 900 वर्ष जतन केले.
शंभर वर्षांपूर्वी म्हणजेच 1924 मध्ये कांचीच्या शंकराचार्यांनी असे विधान केले की हे शिवलिंग 100 वर्षांनी भारतातील दक्षिणेकडील शंकर नामक एका संतांकडे सुपूर्द करावे.
अशा रीतीने 2024 मध्ये शंकराचार्यांच्या सल्ल्यावरून सोमनाथ मंदिराच्या ब्राह्मणांनी आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर जी यांच्याकडे ते बेंगलोर आश्रम येथे सुपूर्द केले.
हेच ज्योतिर्लिंग आर्ट ऑफ लिविंग तर्फे येत्या बुधवारी (ता. २५) ठाण्यात आणले जाणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. भाविकांना या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांनी सांगितले.
२५ जून रोजी संध्याकाळी साडे पाच वाजता आर माॅलमधील आय लिफ रिटझ बॅन्क्वेट सभागृह, तिसरा माळा, घोडबंदर रस्ता, ठाणे पश्चिम येथे सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन आणि रुद्र पुजा आणि सत्संग पार पडणार आहे. ठाणे, कल्याण, मुंबई, डोंबिवली परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी या दर्शन सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आणि सर्वांसाठी खुला आहे.
या धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ९८२०९२८३८६ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment