११ प्रवेश प्रक्रिया सुरू



मे (जिल्हा परिषद, ठाणे) – राज्यस्तरीय केंद्रीयकृत ११वी प्रवेश प्रक्रिया (शैक्षणिक वर्ष २०२५–२६) सुरू झाली असून, ठाणे जिल्ह्यातील ४५४ कनिष्ठ महाविद्यालये यामध्ये सहभागी झाली आहेत. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी वेळापत्रकानुसार ऑनलाईन नोंदणी व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहितुले यांनी केले आहे.


फेरी क्र. १ चे तपशीलवार वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:

दिनांक तपशील

१९ - २० मे सराव सत्र (Practice Session) – विद्यार्थ्यांसाठी पोर्टलवर

२१ - २८ मे प्रत्यक्ष नोंदणी व महाविद्यालय पसंतीक्रम भरणे (१ ते १० पर्यंत)

३० मे तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर

३० मे – १ जून हरकती व दुरुस्ती प्रक्रिया

३ जून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

५ जून गुणवत्तायादीवर आधारित प्रवेश वाटप (शून्य फेरी)

६ जून वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध

६ - १२ जून "Proceed for Admission" पर्यायाद्वारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे

१४ जून दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर


         प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्रांची स्कॅन प्रत अपलोड करणे आणि संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी प्रथम पसंती मिळाल्यास तिथेच प्रवेश घेणे अनिवार्य राहील.


          एकदा प्रवेश घेतल्यानंतर तो अंतिम मानण्यात येईल. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये गांभीर्याने सहभागी व्हावे आणि वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे. 


अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी:

🌐 www.mahafyjcadmissions.in

📧 Email: support@mahafyjcadmissions.in


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत