आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित “संविधान गौरव यात्रा" उत्साहत पार..

 


ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारने आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व भारतीय संविधान अमृतमहोत्सवर्षानिमित्त ठाण्यात भव्य संविधान गौरव यात्रा काढण्यात आली. या रॅलीत आमदार निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, बौद्ध धर्मगुरू, भन्ते, माजी नगरसेवक संदीप लेले, नारायण पवार, भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, सुरेश कांबळे, युवा मोर्चा अध्यक्ष सुरज दळवी, सचिन पाटील, राजेश गाडे, विशाल वाघ, कृपाल कांबळे, प्रदीप जाधव व असंख्य भीमसैनिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही रॅली मोठ्या उत्साहत पार पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जय घोषाने वातावरण भीममय झाले होते. 


भाजपा खोपट कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तसबीरीला पुष्पहार घालून भन्ते यांच्या उपस्थितीत वंदना घेऊन रॅलीस सुरुवात झाली. आंबेडकर रोड, कोर्ट नाका येथील संविधान चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा व पुढे बाजारपेठेतून स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ रॅली समाप्त झाली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर उपस्थित नागरिकांनी रॅलीचे जोरदार स्वागत केले. या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमला आ. केळकर, आ. डावखरे यांनी भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. पुढे कोर्ट नाका येथील अशोक स्तंभ येथे असलेल्या संविधान प्रतिमेस आ. केळकर, आ. डावखरे, संजय वाघुले व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुष्पसृष्टी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार करून पुढे डॉ.  बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार घातला. 


बाजारपेठेतून रॅली जात असताना दुकानदारांनी रॅलीवर व बाबासाहेबांच्या तसबीरीवर फुलांचा वार्षाव केला. स्टेशन रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून रॅलीचा समरोप करण्यात आला. 


आ. केळकर यांनी बोलताना सांगितले की ठाणे नगरी ही डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी आहे. डॉ. आंबेडकरांमुळे आपल्याला घटना मिळाली. न्याय हक्क मिळाला. या घटनेचा व आपल्या कर्तव्याचा आदर करण्याचा संकल्प आपल्याला बाबासाहेबांनी दिला. सर्वांचा विकास सामाजिक न्याय बाबत कटीबद्ध असावे ही शिकवण त्यांनी दिली. बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम. तर आ. डावखरे यांनी नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत