आमदार संजय केळकर यांच्या 'जनसेवकाचा जनसंवाद' उपक्रमाला नागरिकांची रिघ.
ठाण्याचे आमदार संजय केळकर हे दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी भाजपाच्या खोपट कार्यालयात उपस्थित असतात.
आ. केळकर यांनी आज शुक्रवारी खोपट येथील कार्यालयात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, सरचिटणीस सचिन पाटील, दीपक जाधव, महेश कदम, राजेश गाडे, दत्ता घाडगे उपस्थित होते.
ठा म पा अंतर्गत अतिक्रमणे, पाणी विषय, पोलीस स्टेशन तक्रारी, फसवणूक, शैक्षणिक विषय, ब्रम्हाळा तलाव विषय, नोकरी विषय, सहकार क्षेत्रातील विषय, नाशिक येथील पोलीस सोसायटी विषय असे विविध विषयांवरील 50 च्या वर निवेदने यावेळी प्राप्त झाली.
आ. केळकर यांनी भेटायला आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समस्या ऐकून घेतल्या वं निवेदने स्वीकारली. यावेळी काही समस्यांचे निराकरण त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनी वरून बोलून तिथेच केले.
आ. केळकरांच्या 'जनसंवाद' उपक्रमामुळे मिळाला न्याय
प्रतीक शिंदे या तरुणाचे वागळे येथील एका कंपनीत पगाराचे जवळ जवळ ऐशी हजार हे अदा करण्यात आले नव्हते. अशा संदर्भातील तक्रारीचे निवेदन सोमवार दि. 7 एप्रिल रोजी 'जनसंवाद' कार्यक्रमात दिले होते. आ. केळकर यांनी तात्काळ कंपनीतील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि शुक्रवारच्या जनसंवाद कार्यक्रमात प्रतीक शिंदे याला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आ. केळकर यांच्या समक्ष थकीत पैशांचा चेक दिला. प्रतिक याने आ. केळकर यांचे हृदयपूर्वक आभार व्यक्त केले. केळकर साहेबांच्या 'जनसंवाद' उपक्रमाच्या माध्यमातून मला तीन दिवसात न्याय मिळाला, ते खरे जनसेवक आहेत. अशी भावना प्रतीकने बोलताना व्यक्त केली. तर आ. केळकर यांनीही मला कामानिमित्त भेटायला आलेल्या तक्रारदाराचे जेव्हा काम माझ्याकडून होते, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील समाधान हेच माझे समाधान असते असे सांगून या 'जनसंवाद' उपक्रमाच्या माध्यमातून आज पर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे विषय सोडवून त्यांना मला न्याय देता आला ही माझ्यासाठी खूप महत्वाची बाब आहे. म्हणूनच नागरिकांसाठी जनसंवाद हा उपक्रम म्हणजे तक्रार दूर करण्याचे केंद्र च झाले आहे. "आमदार आपल्या भेटीला" हा उपक्रम मी 2014 पासून विविध गृहसंकुलात घेत आलो आहे आणि आता पर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि याच माध्यमातून जवळ जवळ 45000 नागरिकांशी संवाद साधला आहे.

Post a Comment