आरोग्य विभागामार्फत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) नोंदणी
राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना दि. २ जुलै, २०१२ पासून राज्यात राबविण्यात येत आहे, तर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची आरोग्य विमा योजना असून दि. २३ सप्टेंबर, २०१८ पासून राज्यात लागू करण्यात आली. दिनांक २६ फेब्रुवारी, २०१९ च्या शासन निर्णयान्वये आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी सांगड घालून दोन्ही योजना राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सुधारीत योजनेची दि. ०१.०४.२०२० पासून राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे
सध्या आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (PMJAY) आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.५ लक्ष एवढे आहे तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत (MJPJAY) आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. १.५ लक्ष एवढे आहे. आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गतही आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.५ लक्ष एवढे करण्यात येत आहे
आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन अरोग्य योजनेचे लाभाथी घटक - सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेत (SECC) नोंदीत समाविष्ट कुटुंबे, अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंबे तसेच याशिवाय राज्य शासनाने शिफारस केल्यानुसार केंद्र शासनाने निश्चित केलेली कुटुंबे हे आहेत. राज्यातील कुटुंबे प्रथमत: राज्य शासनाच्या निर्देश नुसार पिवळे व केशरी रेशन कार्डधारक लाभार्थी यांचे आयुष्यमान कार्ड काढण्यात येत आहे. आतापर्यंत नमुंमपा अंतर्गत एकूण 41640 आयुष्यमान कार्ड आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत काढण्यात आले आहेत.
        महापालिका आयुक्त् यांनी नवी मुंबई शहरातील नागरीकांना PMJAY व MJPJAY या योजने अंतर्गत रु. 5 लक्ष प्रति कुटुंब प्रति वर्षासाठी आरोग्य विमा लाभ घेण्याकरीता आयुष्यमान कार्ड/MJPJAY कार्ड तयार करून घेण्याकरीता शासनाचे संकेतस्थळ https://setu.pmjay.gov.in/

Post a Comment