निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणीला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा... शिवसेना (ठाणे जिल्हा शाखा महिला) आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी - ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला जिल्हा आघाडी कडून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना तहसीलदार मार्फत एक निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू करून मानधन १५०० वरून २१०० रुपये करणार असे आश्वासन दिले होते. परंतु गेले दोन महिने मानधनच खात्यात जमा न झाल्याने महिलांच्या मनात शासनाच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. महिलांचा अपेक्षाभंग केल्यामुळे सरकारने तात्काळ महिलांना मानधन बँकेत जमा करावा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली. त्यावेळी ठाणे जिल्हा संघटक रेखा खोपकर, शहर संघटक वैशाली शिंदे, उप शहर संघटक अनिता प्रभू, मंजिरी धमाले, शाखा संघटक सीमा पाटील व इतर महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment