ठाणे महानगर पालिकेची आरोग्य व्यवस्था धुळीत कोट्यवधींची आधुनिक साधने भंगारात
ठाणे महानगर पालिकेची आरोग्य व्यवस्था धुळीत कोट्यवधींची आधुनिक साधने भंगारात
ठाणे (बातमीदार) एकीकडे ठाणेकरांना योग्य आरोग्य सुविधा मिळणे कठीण झाले असताना दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे कोट्यवधींच्या किंमतींची आधुनिक आरोग्य साधने धुळखात पडली आहेत. हजारोंच्या संख्येने भंगारात पडलेल्या या साधनांच्या माध्यमातून ठाणेकरांच्या मोफत उपचारासाठी एक भव्य सुपरस्पेसेलिटी रुग्णालय उभे करता येऊ शकते. परंतु ठाणेकरांची आरोग्य यंत्रणा आधीच व्हेंटिलेटर वर असताना त्यांच्याकरिता आलेली ही आत्याधिनिक साधने भंगारात ठेवल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रोज हजारोंच्या संख्येने उपचारासाठी येत आहेत. त्या रुग्णांना रुग्णालयात साधनांच्या अपुऱ्या संख्येमुळे उपचार मिळणे कठीण झाले आहे. अनेक रुग्णांना उपचार घेण्यासाठी खाट, गादी उपलब्ध होत नसल्याने त्यांना जमिनीवर झोपून उपचार घावे लागत आहेत. तर अनेक रुग्णांना जागेअभावी मुंबईमधील रुग्णालयांमध्ये पाठवले जात आहे. तर दुसरीकडे मात्र रुग्णांना उपचार घेण्यासाठी लागणाऱ्या आधुनिक खाटा, गाद्या, स्ट्रेचर, सलाईन स्टॅन्ड, खुर्च्या, टेबल, औषधे ठेवण्यासाठी लागणारे बॉक्स इत्यादींसह दुचाकी रुग्ण वाहिण्या धुळखात पडल्या आहेत. ठाणे महानगर पालिकेने तयार केलेल्या माजिवडा येथील पार्किंग प्लाझा इमारतीच्या सहाव्या आणि सातव्या मजल्या वर ही साधने ठेवण्यात आली आहेत. कोरोनाच्या काळात खरेदी करण्यात आलेल्या या साहित्यांची किंमत कोट्यवधी रुपये असून पालिकेच्या असंवेदनशील आणि नियोजन शून्य कारभारमुळे ठाणेकरांच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या या साधनांची माती होत आहे.
सहाव्या मजल्यावर 30 हून अधिकदुचाकी रुग्णवाहिण्या धुळखात उभ्या आहेत. वाहतूक कोंडीवर मात करून अरुंद आणि गल्लीबोळातून रुग्णांना लवकर रुग्णालयात दाखल करता यावे, आवश्यक औषधी मदत पोहचवता यावी यासाठी पालिकेने दुचाकी रुग्णावाहिन्या खरेदी केल्या आहेत. मात्र त्यांचा वापर न करता त्या भंगारात ठेवण्यात आल्या आहेत. रॅपिड रिस्पॉन्स अंब्युलेश असे तिला नाव देण्यात आले आहे. मात्र जनतेच्या पैशातून खरेदी करण्यात आलेल्या या सर्व रुग्णावाहिन्या मातीमोल झाल्या आहेत.
Post a Comment