शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे या द्वयीकडून शेकडो तक्रारींचे निवारण

ठाणे  : ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणुन घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसुत्रीवर आधारीत आनंद आश्रमात आज मंगळवार रोजी 'जन संवाद' उपक्रमाचे आयोजन. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचे निवारण यावेळी केले. दरम्यान, दर मंगळवारी आनंद आश्रमात जन संवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असुन दर गुरुवारी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तसेच ठामपा संबधित नागरीकांच्या तक्रारी व समस्या सोडविल्या जाणार असल्याचे अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

   शिवसेनेचे 'ठाणे' ठाण्याची 'शिवसेना' हे ब्रीद जपत आजवर ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा शिरस्ता माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखला आहे. या पार्श्वभुमीवर ठाण्यातील शिवसेनेच्या शाखा शाखांमध्ये प्रभागातील समस्यांची तड लावली जात आहेच. तर, आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळीनीही लोकांच्या समस्या ऐकून त्या संबंधित प्रशासनाकडून सोडवून घेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी जन संवाद उपक्रमाचे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसुत्रीवर आधारीत शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात *जन संवाद* उपक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आज  


* अतिक्रमण विषय 

* कर आकारणी नव्याने करा करणे 

* इमारतीमधील समस्यांचे विषय 

* झाडे तोडणे नालेसफाई 

* स्थानिक महिला खेळाडूंना परदेशी जाण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी मधून आर्थिक मदत करण्याबाबत विषय 

* पाण्याच्या बिलाबाबतचे विषय / नवीन जोडणी करणे 

* विभागामध्ये विद्युत लाईट नसणे

*  आर्थिक फसवणूक व मदत मिळण्याबाबत इमारत विकासकांच्या विषयी तक्रारी

* दिव्यांग नवीन दुकाने मिळण्याबाबत प्रलंबित प्रश्न दुकानांचे 

* वाहतूक विभागातील समस्या रोड लगतच्या पार्किंगमुळे होणाऱ्या त्रास अनधिकृत पार्किंग

*  मला निस्तारन  संदर्भातले विषय दुर्गंधी रस्त्यावरच्या पाण्यातले विषय आनंद आश्रमात आयोजित  जन संवाद उपक्रमात उपस्थित शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी व समस्यांचे निवेदन यावेळी सादर केले. या प्रसंगी माजी महापौर अशोक वैती 

माजी विरोधी पक्ष नेते मनोज शिंदे 

माजी नगरसेवक जनार्दन खेतले

माजी नगरसेवक अशोक  बोरीटकर

माजी नगरसेवक शैलेश शिंदे 

नौपाडा विभाग प्रमुख किरण नाकती ठाणे महानगर पालिकेचे निवृत्त अधिकारी रतन अवसरमोल

तसेच पदाधिकारी

श्रीमती रेखाताई मिरजकर

संदीप शिंदे 

बाबा शिंदे  यांच्यासह ठाणे महापालिका हद्दीतील शिवसेनेचे सर्व शहर प्रमुख व उपशहर प्रमुख, पदाधिकारी शिवसैनिक, कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत