दिव्यात अनधिकृत बांधकामावर हतोडा.
संतोष पडवळ - प्रतिनिधी
ठाणे, दिवा ४ मार्च : दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उभारला आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई ठाणे महानगरपालिका उपायुक्त परिमंडळ १ व दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त राजेंद्र गिरी यांनी दिवा शहरात प्रभाग २८ मध्ये अनधिकृत बांधकामावर केली आहे.
दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज दिनांक ४ मार्च २०२५ रोजी दिवा प्रभाग समितितील प्रभाग २८ मधील नव्याने सुरु असलेल्या दोन अनधिकृत इमारतीचे प्लिंथ तोडण्यात आली. ठाणे महानगरपालिका मा. उपायुक्त परिमंडळ १ श्री. मनीष जोशी साहेब यांच्या आदेशान्वये व दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त श्री.राजेंद्र गिरी व बिट निरीक्षक श्री. सुहास रोकडे यांचे उपस्थितीत यंत्रसामुग्री व जेसीबीच्या सहायाने पोलीस बंदोबस्तात सदरची कारवाई करण्यात आली.
Post a Comment