ठाण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समर्पित रांगोळी

 




ठाणे  : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना समर्पित रांगोळी ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, जांभळी नाका, ठाणे येथे साकारण्यात आली आहे. हिंदू नववर्षा स्वागतासाठी धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समारोह समिती यांच्या संयुक्त ही रांगोळी साकारण्यात आली आहे.

या रांगोळीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यातील कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व त्यांच्या जन्माच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त अधोरेखित केले आहे. हिंदू समाजाच्या एकत्वासाठी अस्मितेसाठी अनेक मंदिरे,नदी घाट, धर्मशाळा, विहिरी, बारव तसेच भारतातील ४१ वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे दोन हजार बांधकामे केली अशा या लोकमातेला रांगोळीतून अभिवादन करण्यात आले आहे. तसेंच रांगोळी भोवती व स्मारक परिसरात दीपोत्सव करण्यात आला.ही रांगोळी प्रकाश बोर्डे व कलाकारांनी साकारली आहे.कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीने आयोजित नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने ही रांगोळी साकारण्यात आली आहे.

 याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज व समारोह समितीच्या अध्यक्षा ऍड रुचिका शिंदे, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व समारोह समितीचे उपाध्यक्ष दीपक कुरकुंडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्ष माधवी बारगीर, सचिव गायत्री गुंड, सुजाता भांड, सीमा कुरकुंडे, वंदना वारे,नीता वारे,नयना पळसे,प्रतिष्ठानचे खजिनदार अनिल जरग,कार्यकारणी सदस्य सुरेश भांड, राजेश वारे, महेश पळसे,प्रमोद वाघमोडे आदिसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत