अमरावती विमानतळाला मिळाला डीजीसीआयकडून एरोड्रम परवाना
अमरावतीवरुन उड्डाणाचा मार्ग मोकळा
अमरावती विमानतळाला हवाई उड्डाणासाठी आवश्यक असलेला परवाना डीजीसीएकडून प्राप्त झाला आहे.
त्यामुळे आता अमरावती विमानतळावरुन हवाई उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला आहे. अलायन्स एअरचे अमरावती-मुंबई-अमरावती असे विमान त्यामुळे या महिनाअखेरीस पासून धावणार आहे.
डीजीसीएचे हे प्रमाणपत्र प्रातिनिधीक स्वरुपात एमएडीसीच्या एमडी स्वाती पांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपविले.
Post a Comment