विधानभवनात मॉकटेस्ट नावनोंदणी पोर्टलचे अनावरण

 युवासेनेतर्फे JEE MAINS, MHT CET, NEET ऑनलाईन मॉकटेस्ट

उपमुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथ शिंदे साहेबांतर्फे युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या कामाचे कौतुक

जेईई मेन्स, एमएचटी सीईटी आणि नीट परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या मनातील भिती दूर व्हावी आणि त्यांना निर्धास्तपणे आत्मविश्वासाने या परिक्षांना सामोरे जाता यावे यासाठी शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मा. खा. डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतून युवासेनेतर्फे ऑनलाईन मॉकटेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री मा. ना. श्री. प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत या परीक्षा नावनोंदणी पोर्टलचे आज विधानभवन, मुंबई येथे अनावरण करण्यात आले. राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करून या ऑनलाईन मॉकटेस्टमध्ये सहभागा घ्यावा असे आवाहन पुर्वेश सरनाईक यांच्यातर्फे करण्यात आले. 


धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी विद्यार्थ्यांच्या मनातील दहावीच्या परीक्षांची भीती दूर करण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिवसेना सराव परीक्षा सुरु केली. ही सराव परिक्षा सक्रीय ठेवण्याची परंपरा गेली अनेक दशके महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब अविरतपणे जपत आहेत. याच दृष्टीकोनातून युवासेनेने एक पाऊल पुढे टाकत जेईई मेन्स, एमएचटी सीईटी आणि नीट परिक्षांबद्दलची भिती विद्यार्थ्यांच्या मनातून जावी यासाठी शिवसेना ऑनलाईन मॉकटेस्ट आयोजित केली आहे. आज मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते या परिक्षेच्या नावनोंदणी पोर्टलचे अनावरण करण्यात आले. मुख्य परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना परीक्षा पध्दती आणि अभ्यासाची उजळणी व्हावी तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील भिती दूर व्हावी हा या ऑनलाईन मॉकटेस्टमागचा मुख्य उद्देश आहे. वाकणकर सिनर्जी अकॅडमी आणि स्प्लॅशगेन-एकलव्य यांचेही मोलाचे सहकार्य या उपक्रमासाठी लाभले आहे. संपूर्ण देशभरातील कुठलाही विद्यार्थी आपल्या ठिकाणाहून ही ऑनलाईन मॉकटेस्ट त्याच्या सोयीनुसार देऊ शकतो अशी व्यवस्था परीक्षा नियोजनात करण्यात आली आहे. याकरिता विद्यार्थ्यांना दिनांक ११ मार्च ते २१ मार्च या कालावधीत https://shorturl.at/4lQQu या लिंकवर जाऊन Register here या बटणावर क्लिक करत ऑनलाईन  मॉकटेस्टसाठी नोंदणी करायची आहे. २६ मार्च, बुधवार - JEE MAINS (Engineering), ६ एप्रिल, रविवार - MHT CET (Engineering/Pharmacy), २० एप्रिल, रविवार - NEET (Medical) असे ऑनलाईन मॉकटेस्टसाठीचे वेळापत्रक आहे. 


या ऑनलाईन मॉकटेस्टचे संयोजन युवासेना विद्यापीठ व कॉलेज कक्ष प्रमुख सल्लागार महादेव जगताप आणि युवासेना महाराष्ट्र समन्वयक विराज निकम हे करत असून नावनोंदणी करताना कुठलाही अडथळा येत असल्यास yuvasena.mocktest2025@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा असे आवाहन युवासेनेतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत