नवी मुंबई महानगरपालिका चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ"

                                                


         नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा  सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रत्येक वर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.यामध्ये नवी मुंबई शहरातील शालेय विद्यार्थ्यांपासूनयुवकांसह  ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा सहभागी होता येईल अशा स्वरुपाच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.

          नवी मुंबई मधील पुर्वीचे गाव  शहरी भाग यातील ४० वर्षा वरील खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहेयामध्ये ५७ संघांनी सहभाग घेतला आहे४०क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने प्लॉट नं.,सेक्टर-१५ बेलापूर येथील मैदानावर आयोजन करण्यात आले.

          या स्पर्धेचा शुभारंभ मा.ना.श्री.गणेशजी नाईक मंत्री,वने महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते संपन्न झालायावेळी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवारउप आयुक्त श्रीमअभिलाषा पाटील,कार्यकरी अभियंता श्री.मदन वाघचौडेउप अभियंता श्री.पंढरीनाथ चवडे,  क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव४०क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीप्रदिप पाटील  इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

          स्पर्धेच्या शुभारंभा प्रसंगी  माना.श्री.गणेशजी नाईक यांनी नवी मुंबई शहरात ४०क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून नेहमीच उत्तम सामाजिक कामे केली जातात याबद्दल असोसिएशनचे कौतुक केले तसेच  वयाच्या ४० वर्षांनंतर सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देवून आनंदी आयुष्य जगता यावे यासाठी निर्व्यसनी राहून जमेल तेवढे खेळावेचालावे तसेच दररोज व्यायामयोगाप्राणायाम करावेतविशेषतः सर्वांनी तीन-तीन महिन्याने आरोग्याची तपासणी करून त्यानुसार तात्काळ उपचार करावेत त्यामध्ये दिरंगाई करू नये याबाबत मार्गदर्शन केले.

          आज नवी मुंबई महानगरपालिका चषक ४०क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील क्रिकेट प्रेमींना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याबरोबरच जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्वांना एकत्र घेऊन शहराच्या विकासासाठी हातभार लावला पाहिजे असे मत व्यक्त केले.

           दरम्यान दि.२८ फेब्रुवारी ते ०२ मार्च,२०२५ या कालावधीत खेळवले जाणाऱ्या स्पर्धेत सहभागी संघांना  खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत