नमुंमपा चषक 40+ क्रिकेट स्पर्धेत गावकी विभागात दिवा कोळीवाडा 40+ संघ* *शहरी विभागात युनायटेड स्पोर्टस, ऐरोली संघ विजयी
नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने .28 फेब्रुवारी,2025 ते दि.02 मार्च,2025 या कालावधी महानगरपालिका चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन बेलापुर येथील मैदानावर करण्यात आले होते. 40+ क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने व त्यांच्याकडील नोंदणीकृत गावकी 33 व शहरी 24 अशा दोन गटातील एकुण 57 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेचा शुभारंभ दि.28 फेब्रुवारी,2025 रोजी मा.ना.श्री.गणेशजी नाईक, मंत्री-वने, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यास्पर्धा तीन दिवसात दोन्ही गटातील संघांना बाद पध्दतीने खेळवण्यात आले.
या स्पर्धेत गावकी गटामध्ये उपांत्यफेरीचा सामना दिवा कोळीवाडा 40+ विरुध्द तळवली 40+ संघ यांच्यामध्ये होऊन यात दिवा कोळीवाडा संघाने फलंदाजी करत 04 षटकांत 39 धावांचा आव्हान ठेवत तळवली संघास 36 धावांमध्ये रोखत 03 धावांने जिंकुन अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरा उपांत्यफेरीचा सामना खारीगाव 40+ संघ विरुध्द बोनकोडे 40+ संघ यांच्यामध्ये झाला बोनकोडे संघाने प्रथम फलंदाजी करत 04 षटकात 44 धावांचा आव्हान ठेवले. यास खारीगाव संघाने 07 विकेटने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीचा सामना खारीगाव संघ व दिवा कोळीवाडा या दोन संघात झाला यामध्ये दिवा कोळीवाडा संघ 05 षटकात प्रथम फलंदाजी करताना 71 धावांचा लक्ष ठेवले. यामध्ये खारीगाव संघास 28 धावांनी नमवत दिवा कोळीवाडा संघ अंतिम विजेतेपद पटकाविले.
शहरी गटामध्ये उपांत्यफेरीचा सामना युनाटेड प्लस,ऐरोली विरुध्द एसडी 11 नेरुळ संघ यांच्यामध्ये होऊन यात युनाटेड प्लस,ऐरोली संघ प्रथम फलंदाजी करत 04 षटकांत 25 धावांचा आव्हान ठेवले यास एस डी नेरुळ संघाने 07 विकेटने जिंकुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीचा सामना युनाटेड स्पोर्टस,ऐरोली व एसडी 11 नेरुळ या दोन संघात झाला यामध्ये युनायटेड स्पोर्टस,ऐरोली संघ प्रथम फलंदाली करत 05 षटकात 109 धावांचा मोठा आव्हान उभे केले. यामध्ये एसडी 11 नेरुळचा संघ 63 धावांमध्ये रोखुन 46 धावांनी नमवत युनायटेड स्पोर्टस ऐरोली संघाने अंतिम विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेत गावकी विभागात मालिकावीर म्हणून श्री.प्रेमानंद केणी-दिवा कोळीवाडा, उत्कृष्ठ फलंदाज श्री.जनार्दन कवळे-खारीगांव,उत्कृष्ठ गोलंदाज श्री. संदीप पाटील-तळवली, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक श्री.सोमनाथ पाटील-बोनकोडे यांना सन्माचिन्ह देवुन सन्मान करण्यात आला.
त्याचबरोबर शहरी विभागात मालिकावीर म्हणून श्री. मारको-युनायटेड स्पोर्टस ऐरोली, उत्कृष्ठ फलंदाज श्री.फिरोज खान- एसडी 11,नेरुळ, उत्कृष्ठ गोलंदाज श्री. राजू- युनायटेड प्लस, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक श्री.दत्ता मोहिते-युनायटेड प्लस,ऐरोली यांना उपस्थित प्रमुख अतिथी श्रीम. अभिलाषा पाटील उप आयुक्त-क्रीडा व सांस्कृतिक विभाग, श्री.प्रदिप पाटील- अध्यक्ष 40+ क्रिकेट असोसिएशन, श्री.नरेश गौरी- उपाध्यक्ष 40+ क्रिकेट असोसिएशन, श्री. मनोज म्हात्रे-खजिनदार 40+ क्रिकेट असोसिएशन, श्री.सुरेश राणाजी- शहरी उपाध्यक्ष, श्री.विकास मोकल-सचिव 40+ क्रिकेट असोसिएशन यांच्या शुभहस्ेक वैयक्तिक पारितोषिके व विजेत्या संघास महानगरपालिका चषक देवुन सन्मानित करण्यात आला.
Post a Comment