कोपरीतील महाआरोग्य शिबिरात ५०० हून अधिक कोपरीकरांनी घेतला लाभ

 

ठाणे: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आणि युवा सेना (कोपरी विभाग) यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबीरात ५०० हुन अधिक कोपरीकर नागरिकांनी लाभ घेतला. हे शिबीर कोपरी पूर्व येथील पारशीवाडी येथील विद्यासागर एज्युकेशन सोसायटी (सिंधी शाळा) येथे भरवण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका नम्रता पमनानी, मालती पाटील, शर्मिला गायकवाड आदी उपस्थित होते.

       शिवसेना आणि युवा सेना (कोपरी विभाग) यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजक स्वप्नील लांडगे, स्वयंसिद्धा महिला चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवस्वप्न फाऊंडेशन यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले.

याशिबिरात मोफत शत्रक्रीयाहृदय, किडनी, कॅन्सर, रक्तदाब, डोळे तपासणी, हृदयाचे ठोके ऑक्सीजन लेवल, बॉडी फॅट, बॉडी मास, बोन भास. बी. एम. आय. उंची/वजन, शरीरातील पाण्याची लेवल, शरीरातील व्हिजिरीयल फॅट, कमी दरात चष्मा वाटप, रक्त (रक्तातील साखर) तपासणे, मेटाबोलिक वय, एच.बी.१सी. मधुमेह तपासणी, एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया, मुतखडा, जनरल मेडिसीन, युरो सर्जरी, गुडघा बदलणे, गायनॅक, ऑर्थोपेडीक, गर्भाशयाच्य, मुळव्याध, अपेन्छिहस, क्रिटीकल केअर, हार्ट फेलर, हार्निया शस्त्रक्रीया, मणक्याची शस्त्रक्रीया, कार्डियाक, अल्प दरात मोती बिंदु शस्त्रक्रीया कानातील मशीन अल्प दरात. तर मोफत तपासणी: इ.सि.जी. वजन तपासणी, रडी इको तपासणी, टी. एम. टी तपासणी, स्त्रियांचे आजार, ब्लडप्रेशर, एन्जोओग्राफी तपासणी, एन्जो ओप्लास्टी शस्त्राक्रिया, बायपास शस्त्रक्रिया वॉल्व (झडप शस्त्रक्रिया), थ्रोम्बोलायोयान, आय. ए. बी. पी. उपचार, पेसमेकर शस्त्रक्रिया, सूत्र पिंडाचे आजार व विकार, थायरॉईड, सांधेदुखी, डायबेटीस (शुगर), फुफपस तपासणी, शरीरातील कॅल्शीयम प्रमाणाची बी.एम.डी चाचणी, महिलांकरीता कर्करोग निदान चाचणी , मोफत आधार आणि पॅन कार्ड, नवीन मतदार नोंदणी तसेच महिलांना शून्य बॅलन्स अकांऊटमध्ये आय.डी.बी.आय बँक तर्फे मोफत खाते तसेच  मुद्रा लोन करुन देण्यात आले. यावेळी प्रकाश  कोटवानी, हेमंत पमनानी. रमाकांत पाटील.प्रशांत पाटील, संतोष बोडके, कुणाल पाटील, गणेश मुकादम, संतोष पांचाळ बाळा केदार, राजेश बठीजा आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत