आयुष्मान कार्ड’ ऑनलाइन काढण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन
(जिल्हा परिषद, ठाणे)- ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये सुरू केली होती. देशातील सर्वसामान्य लोकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे या योजनेचा उद्देश आहे. २०१८ पासून सुरू असणाऱ्या या योजनेमध्ये पात्र कुटुंबातल्या व्यक्तींसाठी मिळून ५ लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जात असून सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.
आर्थिक मदत
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना १ हजार ३५६ आजारांवरील उपचारांसाठी ५ लाख रुपये प्रति कुटुंब लाभ
महाराष्ट्र आणि भारत सरकारचा खर्च सहभाग ६०:४० च्या प्रमाणात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना मोफत आरोग्य विमा संरक्षण लागू
एकात्मिक योजना – मुख्य वैशिष्ट्ये
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी सार्वत्रिक आरोग्य संरक्षण.
नेटवर्क रुग्णालयांमध्ये रोखरहित दुय्यम आणि तृतीयक आरोग्य सेवा.
प्रत्येक कुटुंबासाठी प्रति वर्ष ५ लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण (फॅमिली फ्लोटर तत्त्वावर).
३४ वैशिष्ट्यांमध्ये १ हजार ३५६ आवश्यक शस्त्रक्रिया/उपचारांसाठी रुग्णालयीन सेवा उपलब्ध.
शासकीय रुग्णालयांसाठी राखीव ११९ आरोग्य उपचार व शस्त्रक्रिया पश्चात पाठपुरावा सेवा - दोन्ही योजनांसाठी २६२ आरोग्य उपचार पॅकेज
सर्व पूर्व-अस्तित्वातील आजारांचा पहिल्या दिवसापासून समावेश.
एकत्रित योजनेचे लाभार्थी कोणत्याही सरकारी/खाजगी नेटवर्क रुग्णालयात रोखरहित उपचार घेऊ शकतात.
पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे (PMJAY) लाभ संपूर्ण देशभर लागू.
योजनेबाबत माहिती मिळवण्यासाठी आणि तक्रारी नोंदवण्यासाठी समर्पित कॉल सेंटर उपलब्ध.
पूर्णतः पेपरलेस योजना, समर्पित पोर्टलवर कार्यरत.
प्रत्येक नेटवर्क रुग्णालयात आरोग्यमित्र उपलब्ध, लाभार्थ्यांना मदत व मार्गदर्शन.
आपत्कालीन परिस्थितीत टेलिफोन किंवा ईमेलद्वारे सूचना देऊन उपचार घेता येऊ शकतो.
आयुष्मान कार्ड कोण काढू शकते?
आपले सरकार केंद्र
आशा स्वयंसेविका
योजनेच्या अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र आणि स्वतः लाभार्थी
*आयुष्मान कार्ड कसे प्राप्त करावे?*
1. स्व-नोंदणी :
वेबसाइटवर नोंदणी: beneficiary.nha.gov.in
आयुष्यमान अॅप डाउनलोड करून नोंदणी करणे.
आधार व कुटुंब ओळख क्रमांक प्रविष्ट करून नोंदणी पूर्ण करणे.
2. सेवा केंद्र किंवा आशा कार्यकर्त्यांमार्फत नोंदणी:
जवळच्या अधिकृत सेवा केंद्रात/ सरकारी रुग्णालयात जाऊन आधार व कुटुंब ओळखपत्रासह लाभार्थी पात्रता तपासून अधिकृत नोंदणी करणे.
जवळच्या सरकारी रुग्णालयात किंवा आशा ताई/ कॉमन सर्व्हिस सेंटर / आरोग्यमित्र यांच्या सहकार्याने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे.
*आयुष्मान कार्ड कसे बनवायचे?*
How to Create an Ayushman Card?
1. आयुष्मान अॅप डाउनलोड करा
(Download the Ayushman App)
2. युजर लॉगिनसाठी, मोबाईल नंबर टाइप करा आणि OTP नोंदवा
(Enter Mobile Number & Verify OTP)
3. नाव / राज्य / जिल्हा / आधार कार्ड द्वारे पात्रता तपासा
(Check Eligibility via Name/State/Aadhaar)
4. आधार क्रमांक / रेशन पत्रिका क्रमांक तपासा
(Verify Using Aadhaar/Ration Card Number)
5. आधार e-KYC पडताळणी करा
(Complete Aadhaar e-KYC Verification)
6. तुमच्या मोबाइल मधून फोटो अपलोड करा
(Upload Photo from Mobile & Fill Details)
7. पडताळणी पूर्ण झाल्यावर कार्ड डाउनलोड करा
(Download Ayushman Card after Verification)
याबाबत अधिक माहितीकरीता आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालय, आरोग्य केंद्र, ग्राम पंचायत, अंगीकृत खाजगी रुग्णालयातील आरोग्य मित्र यांच्याशी संपर्क साधावा. तसेच टोल-फ्री क्रमांक : १५५ ३८८ , १८०० २३३ २२ ००, ११५ ३८८ / १८०० २३३ २२००, अधिकृत वेबसाइट: www.jeevandayee.gov.in च्या माध्यमातून माहिती मिळवता येईल.
सर्व पात्र लाभार्थी व्यक्तींनी आपले आयुष्मान कार्ड त्वरित काढून घ्यावे. जेणेकरून, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा अत्यावश्यक वेळेस तात्काळ लाभ घेण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
Post a Comment