सिमेंटचा गाळ रस्त्यावर टाकणा-या वाहनावर कारवाई करीत 30 हजार दंडवसूली
बांधकामासाठी वापरण्यात येणारे सिमेंट काँक्रिट मिश्रीत पाणी रस्त्यावर सोडून दिल्याने त्या ठिकाणी काँक्रिटचा चिखल होऊन वाहने घसरुन अपघात होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने परिमंडळ 2 च्या अतिक्रमणविरोधी भरारी पथकाने परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली धडक कारवाई करीत ज्या वाहनाव्दारे रस्त्यावर काँक्रिटचा चिखल रस्त्यावर सोडण्यात येत होता ते वाहन ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडून 30 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. शहर स्वच्छतेला बाधा आणणा-या घटकांविरोधात महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येत आहे.
Post a Comment