ठाण्यातील खोपट एसटी स्थानकावर खाकी वर्दीतल्या प्रामाणिकपणाचा अनुभव.

l

खोपट बस स्थानकावर आज घडलेली एक घटना माणुसकीचे दर्शन देऊन गेली 



डॉ. अंजली गांगल, 63 yrs, या खोपट बस डेपो येथे विद्यादान सहाय्यक मंडळाच्या मीटिंगसाठी आल्या होत्या. कार्यालय शोधत असताना त्या मैत्रिणीची वाट पाहत थोडा वेळ तेथील बाकावर बसल्या आणि काही कामासाठी पैशाची पर्स बाहेर काढली. तेवढ्यात दुसरा फोन आला आणि त्या लगबगिने आपली पर्स तेथेच सोडून पहिल्या मजल्यावर गेल्या. पर्समध्ये महत्त्वाची कागदपत्रे आणि वीस हजार रुपये होते.

त्यांना आपली पर्स हरवल्याचे लक्षातही आले नव्हते, पण त्याच दरम्यान त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून दोन-तीन वेळा पाठोपाठ फोन आला.  *एसटी महामंडळाचे ठाणे विभाग नियंत्रक यांचे चालक  श्री विक्रम सुभाष जाधव यांना ती पर्स सापडली होती. त्यांनी पर्स तपासून त्यातील एलआयसीच्या पावतीवरील फोन नंबर पाहिला आणि संपर्क साधून डॉ. गांगल यांना त्यांच्या पर्सची माहिती दिली आणि न्यावयास येण्यास सांगितले. ओळख पटवल्यावर त्यांना त्यांची पर्स परत दिली.*

*चालक श्री. जाधव यांचा प्रामाणिकपणा आणि सेवाभाव समाजातील माणुसकीचे दर्शन घडवतो.* अशा चांगल्या नागरिकांमुळे माणुसकीवरचा विश्वास पुन्हा दृढ होतो आणि समाजाला प्रेरणा मिळते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत