परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज महाराष्ट्र राज्याचा परिवहन मंत्री म्हणून पदभार स्वीकारला
आज महाराष्ट्र राज्याचा परिवहन मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. मंत्रालयात पदभार स्वीकारताना येथील अपर मुख्य सचिव श्री. संजय सेठी व परिवहन आयुक्त श्री. विवेक भीमनवार यांच्या सह इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाने माझे स्वागत केले.
शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांनी ही जबाबदारी दिले त्यांचे मी आभार व्यक्त करतो.
राज्याच्या जनतेला अधिक चांगल्या आणि सोयीस्कर परिवहन सेवा देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. वाहतुकीच्या सुरक्षिततेला अधिक मजबूती देणे, सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सुलभ आणि आधुनिक बनवणे. तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. राज्य परिवहन मंडळाचे उत्पन्न वाढवणे व एसटी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे याकडे प्रामुख्याने भर राहणार आहे.
आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने परिवहन क्षेत्रात नवनवीन प्रकल्प राबवत राज्याचा विकास अधिक वेगाने करूया. आपला विश्वास हीच माझी ऊर्जा आहे आणि त्याचा योग्य वापर करून जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन.

Post a Comment