आम्ही हरलो नाही निवडणूक आयोग व ईव्हीएम जिंकले
अर्थतज्ञ व निवडणूक विश्लेषक विश्वास उटगी
मीरा भाईंदर, प्रतिनिधी - विधानसभा निवडणुकीत आम्ही हरलो नाही तर निवडणूक आयोग व ईव्हीएम जिंकले असे प्रतिपादन अर्थतज्ञ व निवडणूक विश्लेषक विश्वास उटगी यांनी केले.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा मीरा-भाईंदर जिल्हा शाखेच्या वतीने महापालिका निवडणुका पूर्वतयारीसाठी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. तसेच राज्याची अर्थव्यवस्था कशाप्रकारे ढासळलेली आहे, देशावर किती कर्ज वाढले आहे, टॅक्सरुपी जमा केलेला पैसा कशाप्रकारे उधळला जातो, याचा हिशोब मागण्यासाठी आपल्याला आता रस्त्यावर उतरवण्याची वेळ आलेली असल्याचा इशारा यावेळी उटगी यांनी दिला.
मीरा-भाईंदर शहरात सेंट थॉमस चर्च मध्ये आगामी महापालिका निवडणुका पूर्वतयारीसाठी बुधवारी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शिवसेना नेते राजन विचार यांनी देखील उपस्थिती दर्शवित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विचारे म्हणाले की, महायुतीचा विजय ईव्हीएममुळे झाला असल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत प्रचंड मेहतन घेतली. त्यांचा आम्हाला अभिमान आहे, येत्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जोमाने काम करुन विजयश्री संपादन करु, असा विश्वास विचारे यांनी व्यक्त केला. यावेळी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, ओवळा माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मनेरा, शिवसेना प्रवक्ते अनिश गाढवे, मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला त्यावेळी जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण जंगम, महिला जिल्हा संघटक स्नेहल सावंत शहर प्रमुख, विभागप्रमुख ,उपविभागप्रमुख,शाखाप्रमुख ,महिलाआघाडी,युवासेना, ग्राहकसंरक्षण कक्ष, शिववाहतूक सेना व इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निराश होऊ नका त्याच जोमाने कामाला लागा
संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आपण कुठेही कमी पडलो नाही. या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलेसे वातावरण होते. सत्तेचा गैरवापर करून त्यांनी निवडणुक जिंकली असून त्यामुळे निराश होऊ नका आपण त्याच जोमाने काम चालू ठेवा असे मार्गदर्शन केले.

Post a Comment