ठाणे केंद्रावरील राज्य नाटय स्पर्धेला दिनांक ५ डिसेंबर पासून सुरुवात

 


महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी नाट्यगृह येथे सुरू होत आहे. दिनांक ५ डिसेंबर ते १३ जानेवारी या दरम्यान या स्पर्धा होतील. या स्पर्धेत सकाळी ११.३० वा. व  संध्याकाळी सात वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.  

         सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे.  

        या स्पर्धेमध्ये एकूण २४ संघांचा सहभाग आहे. ठाणे शहरासह रायगड जिल्ह्यातील संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत.  राज्य नाट्य स्पर्धेतील नाटक पाहण्यासाठी नाममात्र रु- १५/- व १०/- तिकीट ठेवण्यात आलेलं आहे. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत