रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्यावतीने १०० कर्करुग्णांना ब्लँकेट वाटप
शेकडो कर्करुग्णांना दिली मायेची ऊब...
ठाणे(प्रतिनिधी) डिसेंबर महिन्यात थंडीचा कहर सुरू झाला असल्याने रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्यावतीने १०० कर्करोगग्रस्त रुग्णांना ब्लँकेट वाटप करून मायेची ऊब देण्यात आली. रोटरीच्या या सामाजिक दातृत्वामुळे समाजात एक चांगला संदेश गेला आहे.
टाटा मेमोरीयल सेंटरशी संलग्न असणाऱ्या वांद्रे पूर्व येथील डॉ. अर्नेस्ट बोर्जेस मेमोरीयल होम येथे ब्लॅकेट वाटपाचा हा कार्यक्रम नुकताच पार पडला. रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा रोटेरिअन मेधा जोशी, सचिव रोटेरिअन अमोल नाले यांनी डॉ. नारायण अय्यर यांच्या उपस्थितीत १०० कर्क रोगग्रस्त रुग्णांना ब्लँकेट व फळांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी,बोर्जेस मेमोरीयल होमचे अधिक्षक एम.बी. मालशे आदीसह कर्मचारी वृंद उपस्थित होता. दर महिन्याला रोटरी क्लबतर्फे गरजुंना अन्नदान केले जाते. मात्र आता थंडीच्या मोसमात रुग्णांना मायेच्या उबदार पांघरूणाची गरज असल्याने ब्लॅकेटचे वाटप करण्यात आल्याचे मेधा जोशी यांनी सांगितले.

Post a Comment