डॉ. समीर तोडणकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त २३ कर्मचाऱ्यांचा सन्मान*



- जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ऑक्टोबर व नोव्हेंबर  महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आज, दि. ०९ डिसेंबर, २०२४ रोजी, जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला. 

        जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर यांच्या शुभहस्ते २३ अधिकारी व कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, पेन्शन आदेश देऊन सन्मान करण्यात आला.‌ 

         या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. समीर तोडणकर यांनी सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्याकरिता सदिच्छा दिल्या. त्याचबरोबर ग्रामीण भागात ३८ पेक्षा अधिक काळ कामकाज केल्याबद्दल अभिनंदन केले. आरोग्य, शिक्षण तसेच विविध शासकीय योजना ग्रामस्थापर्यंत पोहोचवण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी यांनी मोलाचे कामकाज केले आहे. यापुढे सेवानिवृत्ती नंतर स्वतःसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी वेळ द्या, अशा सदिच्छा दिल्या. 

         प्राथमिक शिक्षक जयदिप देशमुख व मिठाराम बोंद्रे यांनी जिल्हा परिषदेत सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रम नियोजन केल्याबद्द्ल आभार व्यक्त केले. ३८ वर्ष शिक्षक म्हणून कामकाज करता विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवसापर्यंत शिकवण्याचा अनुभव समृध्द करणारा होता, अशी भावना व्यक्त केली.

       यावेळी सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी कल्पना तोरवणे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनोज देवकर तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ऑक्टोबर महिन्यातील शिक्षण विभाग प्राथमिक ०७, सामान्य प्रशासन विभाग ०३, आरोग्य विभाग ०२ असे एकूण १२ तर नोव्हेंबर महिन्यातील शिक्षण विभाग प्राथमिक ०९, आरोग्य विभाग ०२ असे जिल्हा परिषदेचे एकूण ११ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, कनिष्ठ सहाय्यक, आरोग्य सहाय्यक महिला, वाहन चालक, शिपाई या पदावरील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत