ब्राइट्स सोसायटी तर्फे भव्य चित्रकला प्रदर्शन

 


येत्या शनिवार आणि रविवार रोजी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालनात हे चित्र प्रदर्शन सर्वांसाठी १० ते ६ दरम्यान खुले आहे.  भारतभरातील ४५ चित्रकारांनी ‘संशयवाद’ या गहन विषयावर काढलेली ही चित्रे आहेत.  चित्ररसिकांसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरणार आहे.


माणसाने चिकित्सक असावे. जेणेकरून जीवनातील प्रश्नांची नेमकी उत्तरे मिळणे जास्त सुलभ होते.  संशयवादाचे मूळ अशाच चिकित्सा आणि कुतूहलात असते. विज्ञानाचा उगम ही त्यातूनच होतो.  


चित्रकारांनी याच विषयाचे कलात्मक पैलू साकारले आहेत.  प्रसिद्ध चित्रकार सुधीर पटवर्धन आणि वास्तुरचनाकार संजय उदामले यांनी जूरी म्हणून १०० हून अधिक चित्रातून या चित्रांची निवड केली आहे.  बक्षीस समारंभ रविवारी ३ ते ४ दरम्यान होत आहे. त्यात निवडक १० चित्रे आणि अशाच प्रकारच्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे मिळतील. कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत