माजी महापौर दिवंगत सतीश प्रधान यांना ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली




        ठाणे  : ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर आणि माजी खासदार सतीश प्रधान यांच्या प्रतिमेला अभिवादन करून महापालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांना महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी श्रद्धांजली वाहिली. सतीश प्रधान यांचे रविवार, २९ डिसेंबर रोजी निधन झाले. 


      सोमवार, ३० डिसेंबर रोजी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपूरे, विधि अधिकारी मकरंद काळे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


       ठाण्याचे सुपूत्र सतीश प्रधान यांचे ठाणे शहराच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौरपद भुषविले. ते २१.०३.१९८६ ते ३०.०३.१९८७ या काळात महापौर होते. तत्पूर्वी, ठाण्याचे नगराध्यक्ष आणि महापौरपदानंतर राज्यसभेचे दोनदा खासदार झाले. 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत