दिव्यांग निवासी शाळा श्री नाकोडा कर्णबधिर विद्यालय येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट*



  (जिल्हा परिषद ठाणे)- जागतिक दिव्यांग दिनानिमित्त श्री भैरव सेवा समिती, भिवंडी द्वारा संचालित श्री नाकोडा कर्णबधिर विद्यालय, सरवली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आज, दि. ४ डिसेंबर २०२४ रोजी भेट दिली.‌

        याप्रसंगी कर्णबधिर दिव्यांग विद्यार्थीं यांना शिक्षणासोबत व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण व पुर्नवसनाची गरज आहे. श्री भैरव सेवा समिती, भिवंडी चे संस्थापक स्व. राजमलजी जैन यांच्या कार्याची प्रशंसा केली तसेच ठाणे जिल्हयातील एकुण ४ हजार शाळांमध्ये नाकोडा कर्णबधिर शाळा ही इतर सर्व शाळांसाठी आदर्श मॉडेल म्हणून कार्यरत आहे अशा शब्दात शाळेचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी शुभेच्छा दिल्या.

         जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित केलेल्या आंतरशालेय विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विजेत्या विद्यार्थ्यांचे बक्षिस वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे‌ व जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शाळेच्या कर्णबधिर विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्वासमोर मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर केले.

        या शाळेत एकूण २११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात असून 'सहानुभूति नव्हें तर दिव्यांग विद्यार्थ्यांना विश्वासाची गरज आहे, संधी देण्याची आवश्यकता आहे. दिव्यांग हे देशाच्या प्रगतीचे अविभाज्य घटक आहेत, असे मार्गदर्शन जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे यांनी केले. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत