ठाण्यात काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश
ठाणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ मा. नगरसेवक मनोज शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या साथीने शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे शिवसेनेमध्ये स्वागत केले. तसेच त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विभागप्रमुख बबन मोरे आणि शिवसेनेचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment