श्री माँ बाल निकेतन हायस्कूलचे सुवर्ण महोत्सवी वर्षातील 30 व्या आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन
ठाणे - श्री माँ ट्रस्ट संचालित श्री माँ बाल निकेतन हायस्कूलला यावर्षी ठाण्यातील शिक्षण क्षेत्रात 50 वर्ष पूर्ण होत आहे. संस्थेच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी 30 व्या आंतरशालेय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन आज ७ डिसेंबर रोजी श्री माँ ग्रुप ऑफ इंस्टीट्युशनचे ट्रस्टी श्री.आर.राजन आणि श्रीमती संतोष राजन यांच्या हस्ते संपन्न झाले. चिटणीस रमेश जोशी, प्रिन्सीपॉल सेजल नारंग (श्री माँ बाल निकेतन), प्रिन्सिपॉल मिनी नायर (श्री माँ विद्यालय) आणि हजारोंच्या संख्येने विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी आणि व्यक्तीमत्त्वाला आकार देण्यासाठी गेली अनेक वर्ष आंतर शालेय स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे, मुलुंड, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली येथील विविध शाळांमधील मुले उत्साहाने सहभागी होतात. यावर्षी जवळ-जवळ 50 शाळांनी सहभाग घेतला आहे.
कथाकथन, स्पेलॅथॉन, पॉटपेंटींग, चित्रकला, संस्कृत पाठांतर, हस्ताक्षर, फॅब्रिक पेंटीग, काव्यपठण, मराठी-इंग्रजी-हिंदी या तिन्ही भाषांमधील वक्तृत्व स्पर्धा, सायन्स क्वीज, पुष्परचना, गायन, संगणकीय सादरीकरण (कॉम्प्युटर प्रेझेंटेशन) टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू तयार करणे, मेहंदी अशा विषयांच्या स्पर्धेत मुले आनंदाने उत्साहात सहभागी झाली आहेत. या स्पर्धांमध्ये त्या त्या विषयातील तज्ञ व्यक्तींना परिक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. स्पर्धेत जे विद्यार्थी प्रथम आणि इतर क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह - शिल्ड अशी बक्षीसे देण्यात आली.

Post a Comment