कचराळी तलाव परिसरात केळकर यांनी मॉर्निग वॉक करणाऱ्यांशी संवाद*
ठाणे : दिवाळी संपताच ठाणे शहर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांनी आपल्या प्रचाराचा झंझावात सुरु केला आहे. नुकत्याच त्यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन झाले होते, त्यानंतर मंगळवारी सकाळीच त्यांनी कचराळी तलाव येथे मॉर्निग वॉकला येणाऱ्या जेष्ठ, तरुण, महिला वर्ग यांच्याशी संवाद साधला. अनेक जेष्ठ नागरीकांनी त्यांचे यावेळी जोरदार स्वागत केले. केळकर हे खऱ्या अर्थाने जनसेवक असल्याचेही अनेकांनी यावेळी बोलून दाखविले.
भाजपचे संजय केळकर हे ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा निवडणुक लढवित आहेत. त्यानुसार आता त्यांनी आपल्या प्रचाराला सुरवात केली आहे. मंगळवारी सकाळी ७.३० वाजता त्यांनी थेट कचराळी तलाव परिसराला भेट दिली. यावेळी येथे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या जेष्ठ नागरीक, तरुण मंडळी आणि महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, सुभाष काळे आदींसह इतर पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या जेष्ठ नागरीकांनी त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांच्याशी गप्पा देखील मारल्या. तसेच या निवडणुकीत आपला निर्धार जनसेवक संजय केळकर हेच असल्याचेही अनेकांनी बोलून दाखविले. तब्बल दोन तास केळकर यांनी या परिसरात मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून संवाद साधला. तसेच ठाणे शहरातील विकास कामांसह इतर सोई सुविधा कशा उपलब्ध करुन दिल्या जातील यावर देखील त्यांनी दृष्टीक्षेप टाकला.

Post a Comment