ओवळा माजिवडा मतदारसंघात जनशक्ती जिंकणार* *शिवसेनेचे उमेदवार नरेश मणेरा यांच्या बाईक

 रॅलीत महाविकास आघाडीचा झंझावात



ठाणे प्रतिनिधी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाविकास आघाडीचे ओवळा माजिवडा मतदासर संघाचे उमेदवार नरेश मणेरा यांनी  झंझावात प्रचार आज केला. शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना थेट विधानसभा निवडणुकीची संधी दिल्याने शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. भगवे झेंडे,हातात मशाल घेऊन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण मतदारसंघ आज पिंजून काढला.

      ओवळा माजिवडा मतदासंघात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा सामना पाहायला मिळणार आहे. एकीकडे ईडीच्या भीतीने शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्याना या निवडणुकीत जनता नक्की धडा शिकतावतील असा विश्वास यावेळी शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार नरेश मणेरा यांनी व्यक्त केला. आजच्या बाईक रॅलीला सकाळी ९ वाजता सुरुवात झाली.   हिरानंदानी मेडॉज येथून सुरुवात झाली. त्यानंतर ठामपा शाळा,लोकपुरम गेट,संताजी महाराज सोसायटी,शिवाईनगर शाखा,साई विहार हॉटेल,गजानन महाराज ट्रस्ट,स्वामी विवेकानंद नगर,औदुंबर सोसायटी, गगनगिरी बिल्डिंग,रमेश शेळके चाळ,व्होल्टास कॉलनी,नवीन म्हाडा कॉलनी,शिवाईनगर भारत सहकारी बैंक लि.,पवार नगर बस स्टॉप,आसावरी बिल्डिंग,वसंत विहार शाळा कडील हनुमान मंदिर,कोकणीपाडा शाखा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा,भीमनगर,गावंड बाग,उन्नती गार्डन,रवी इस्टेट,साईबाबा मंदिर रोड,विक्रांत चव्हाण ऑफीस वर्तकनगर येथील रॅलीची समाप्त शिवाईनगर येथे झाली. 

    शिवसेना झिंदाबाद,महाविकास आघाडी झिंदाबाद..नरेश मणेरा आगे बढो,हम तुम्हारे साथ है.. महाविकास आघाडीचा विजय असो या गगनभेदी घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी ओवळा माजिवडा मतदारसंघात नक्कीच बदल झालेला दिसेल असा विश्वास यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या रॅलीत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेस शरदारचंद्र पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई,भास्कर भैरी शेट्टी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत