ठाण्यात बंड शमले...महायुतीच्या संजय केळकर यांच्या विजयचा मार्ग मोकळा..! ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर,संजय भोईर यांचा केळकर यांना पूर्ण पाठिंबा
बाळकूम - ढोकाळी भागात अनेक वर्षांपासून नगरसेवक म्हणून कार्य करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक श्री. देवराम नाना भोईर व श्री. संजयजी भोईर यांची भाजपा महायुतीचे उमेदवार व आमदार श्री. संजयजी केळकर यांनी आज भेट घेतली. या वेळी विविध प्रश्नांबरोबरच प्रचाराच्या रणनीतीबाबत सविस्तर चर्चा झाली. भविष्यात बाळकूम-ढोकाळीतील नागरिकांना परिपूर्ण सुविधा मिळतील, यासाठी कटीबद्ध असल्याचे आमदार श्री. केळकर यांनी सांगितले. तसेच या भेटीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा विक्रमी मताधिक्याने विजय साकारण्याचा निर्धार करण्यात आला. या वेळी Vidhan parishad amdar Niranjan Davkhare ठाणे विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. सुभाषजी काळे, शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. हेमंतजी पवार, श्री. विद्याधर वैशंपायन, माजी नगरसेवक श्री. भुषण भोईर, विकेश भोईर यांची उपस्थिती होते...#news27digital

Post a Comment