महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांची महाविजयाची प्रचार यात्रा घरोघरी
ठाणे,प्रतिनिधी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या महाविजयाची प्रचार यात्रा आज घरोघरी पोहचली. शिवसेनेचे निष्ठावंत उमेदवार राजन विचारे यांच्या स्वागतासाठी चौका चौकात जोरदार मोठी गर्दी पाहायला मिळाली. शिवसेना जिंदाबाद..उद्धव ठाकरे आज बढो..कोण आला रे, कोण आला..ओरिजनल शिवसेनेचा वाघ आला या जयघोषाने संपूर्ण प्रचार दणाणून गेला. तीच निष्ठा,तोच उत्साह यावेळी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटचा टप्पा सुरु झाला असून येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. ठाणे शहर शिवसेना आणि महाविकास आघाडीचा गड असून गेल्या अनेक वर्षात या मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेने केले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली या भागात शिवसेनेचा खासदार,आमदार राहिला आहे. मात्र गेल्या अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेशी गद्दारी करून भाजपच्या बुडाखाली गेलेल्या शिंदे गटाने या भागात शिवसेनेचे वर्चस्व कमी केले असल्याचे कट्टर शिवसेना प्रेमी मतदारांकडून सांगण्यात येत आहे.
आज सायंकाळी ६ वाजता चरई शिवसेना शाखेपासून प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर साईबाबा मंदिर, तीन पेट्रोल पंप, एलबीएस मार्ग, लोकमान्य सोसायटी, दगडी शाळा, चिंतामण चौक, अहिल्यादेवी गार्डन, जोशी वाडा, काबाड आळी, टेंभी नाका, आंबेडकर रोड, मनोहर पाडा, धोबीआळी, गणेश टॉकीज,गीता सोसायटी येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेलो मोठ्या संख्येने शिवसेना आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला आणि युवासैनिक उपस्थित होते.

Post a Comment