२७ गावात महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष भोईर यांचा जोरदार प्रचार
कल्याण – कल्याण ग्रामीण मतदार संघातील २७ गावात महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांनी प्रचारात मुसंडी मारली असून गावा गावात प्रचार रॅलीचे आयोजन करून मतदाराना महाविकास आघाडीची भूमिका समजावून संगीत आहेत. कल्याण ग्रामीण मतदार संघातील २७ गावातील उसरघर, संदप, निळजे, लोढा, पलावा, काटई, घेसर, कोळे, हेदुटणे, खोणी या गावांमध्ये प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या प्रचार रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे सर्वच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. ठीकठिकाणी आरत्या, स्वागत, फटाक्यांची आतषबाजी करित उमेदवारांचे व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात येत होते. या प्रचार रॅली मध्ये कॉंग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे, कल्याण ग्रामीण अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी जिल्हापरिषद सदस्य प्रकाश म्हात्रे, तालुका प्रमुख मुकेश पाटील, माजी पंचायत समिती सभापती जाईबाई पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे मधुकर माळी, रंगनाथ ठाकूर, हरेश देसले, उपतालुका प्रमुख भगवान पाटील, जिल्हा युवा अधिकारी प्रतिक पाटील, विजय भोईर, नेताजी पाटील, किरण ठोंबरे, गणेश ठोंबरे, सुरज जाधव,जयेश ठोंबरे, विकी ठोंबरे, मुकेश भोईर ,पांडूरंग संते, जालींधर पाटील,श्याम संते,अभिजित घिगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
.jpeg)
Post a Comment